शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांवर दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचा कायदा करावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 14:49 IST

देशविरोधी घोषणाबाजी केल्यास अशी घोषणाबाजी करणाऱ्यांवर गोळ्या झाडण्यासाठी एक केंद्रीय कायदा असावा असं बी. सी. पाटील यांनी सांगितलं.

नवी दिल्ली - देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांवर दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचा कायदा करण्यात यावा असं वादग्रस्त विधान कर्नाटक सरकारमधील मंत्री बी. सी. पाटील यांनी केलं आहे. यासंदर्भात आपण पंतप्रधान मोदींना आवाहन करणार आहोत. तसेच असा कायदा आणण्याबाबत केंद्र सरकारकडे विनंती करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. 

देशविरोधी घोषणाबाजी केल्यास अशी घोषणाबाजी करणाऱ्यांवर गोळ्या झाडण्यासाठी एक केंद्रीय कायदा असावा असं बी. सी. पाटील यांनी सांगितलं. यासंदर्भात विचारणा केली असता ''केंद्र सरकारने देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तरतूद असणारा कायदा केला पाहिजे. देशद्रोह्यांना गोळ्या झाडण्याची तरतूद असलेला केंद्रीय कायदा लागू झाला पाहिजे, असे आवाहन मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना करणार'' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

'देशामध्ये हे लोक आपल्या अन्न, पाणी आणि हवेचा आनंद घेतात आणि पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी करतात. काही तरुणांसाठी अशा प्रकारे देशविरोधी घोषणाबाजी करुन लोकप्रियता मिळवणे ही एक फॅशन बनली' असल्याचं देखील पाटील यांनी सांगितलं आहे. गेल्या आठवड्यात सीएए-एनआरसीविरोधात आयोजित करण्यात आलेल्या सभेवेळी अमूल्या लिओना नावाच्या तरुणीने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊन गोंधळ उडवून दिला होता. या सभेला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हेसुद्धा उपस्थित होते. ओवैसी यांनी अमूल्या हिच्या घोषणाबाजीला विरोध केला होता. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. तसेच तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, बी. सी. पाटील यांनी अशा लोकांना त्वरित गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी मागणी केली आहे.   

महत्त्वाच्या बातम्या 

China Coronavirus : उत्तर कोरियात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण, किम जोंग यांनी दिले गोळ्या घालण्याचे आदेश

Delhi Violence: दिल्लीत पुन्हा एकदा दहशतीचं सावट; रविवारी रात्री 'त्या' दोन तासांत काय घडलं? 

दंगलीसाठी ईशान्य दिल्लीच का?, अरुंद रस्ते व निमुळत्या गल्ल्या सोयीच्या

कोरोनाचे संकटही भारतासाठी इष्टापत्ती, निर्यात बाजारात चीनची जागा घेण्याची संधी

तुर्कीचा सीरियावर ड्रोन हल्ला, 19 सैनिकांचा मृत्यू

 

टॅग्स :BJPभाजपाPakistanपाकिस्तानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी