शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गुजरातचा एकमेव मुस्लीम खासदार पुन्हा निवडला जाणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 18:50 IST

अहमद पटेल जिंकले तर गुजरातमधील एकमेव मुस्लीम खासदार म्हणून ओळखले जातील. याआधीच्या राज्यसभा टर्ममध्येही गुजरातमधून जाणारे ते एकमेव मुस्लीम खासदार होते.

ठळक मुद्देभारतीय जनता पक्षाने 2014 साली झालेल्या लोकसभेत गुजरातमधील सर्व जागा जिंकल्या.या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा एकही मुस्लीम खासदार निवडून गेलेला नाही. साहजिकच गुजरातमधूनही लोकसभेत एकही मुस्लीम खासदार निवडून गेलेला नाही.

अहमदाबाद, दि.8- गुजरातमध्ये आज बलवंतसिंग राजपूत आणि अहमद पटेल यांच्यामध्ये राज्यसभेसाठी निवडणूक होत आहे. कॉंग्रेसमधून बाहेर पडून भाजपामध्ये आलेल्या राजपूत यांच्या पारड्यात भाजपाने आपले संपुर्ण वजन टाकले आहे. कॉंग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमद पटेल यांना हरवण्यासाठी भाजपाचे प्रयत्न चालू आहेत. या निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी तो इतिहास रचेल यात शंका नाही. अहमद पटेल या निवडणुकीमध्ये पराभूत झाले तर कॉंग्रेससाठी तो मानहानीकारक पराभव असेल आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा विजय मानला जाईल. पण ते जिंकले तर गुजरातमधील एकमेव मुस्लीम खासदार म्हणून ओळखले जातील. याआधीच्या राज्यसभा टर्ममध्येही गुजरातमधून जाणारे ते एकमेव मुस्लीम खासदार होते.

भारतीय जनता पक्षाने 2014 साली झालेल्या लोकसभेत गुजरातमधील सर्व जागा जिंकल्या. या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा एकही मुस्लीम खासदार निवडून गेलेला नाही. त्यामुळे साहजिकच गुजरातमधूनही लोकसभेत एकही मुस्लीम खासदार निवडून गेलेला नाही. भाजपाच्या लोकसभेतील सर्व 282 खासदारांपैकी एकही खासदार मुस्लीम नाही, सत्ताधारी पक्षाचा लोकसभेत एकही मुस्लीम खासदार नसण्याची ही पहिलीच वेळ असावी. त्यामुळे गुजरातमध्ये अहमद पटेल हे एकमेव मुस्लीम खासदार राज्यसभेत होते. आता आजच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाल्यास हे उदाहरण कायम राहिल. पटेल पराभूत झाल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गुजरातचा एकही मुस्लीम खासदार नसेल. सध्या राज्यसभेत पटेल यांच्याबरोबर मधुसुदन मिस्त्री कॉंग्रेसतर्फे राज्यसभेत गेलेले आहेत.

अहमद पटेल 1977,1980. 1984 असे सलग तीन टर्म्स लोकसभेत निवडून गेले. 1977 साली गुजरातमधून एहसान जाफरीदेखिल लोकसभेत निवडून गेले होते. एहसान जाफरी आणि अहमद पटेल हे आजवर दोनच मुस्लीम खासदार गुजरातमधून लोकसभेत जाऊ शकले आहेत.

कॉंग्रेससाठी अहमद पटेल का महत्त्वाचे ?अहमद पटेल यांचा जन्म 21 ऑगस्ट 1949 रोजी गुजरातच्या भरुचमध्ये झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात त्यांनी 1976 साली प्रवेश केला. 1977 पासून तीन टर्म ते लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर प्रदेश कॉंग्रेस आणि केंद्र पातळीवर त्यांना विविध जबाबदाऱ्या मिळत गेल्या. जवाहर भवन ट्रस्टची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली. सरदार सरोवर प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. त्यानंतर 1993-99, 1999-2005, 2005-2011, 2011-2017 अशा सलग चार टर्म ते राज्यसभेत आहेत. संपुआ सरकारच्या दोन्ही कार्यकाळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने त्यांना पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाल्याचे सांगण्यात येते.

दोन पक्षांचे अध्यक्ष दोन सभागृहांमध्येगुजरात राज्यसभा निवडणुकांमुळे आणखी एक नवी घटना घडणार आहे. भाजपाचे अमित शहा राज्यसभेत निवडून जातील. तिकडे लोकसभेत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी निवडून गेलेल्या आहेत. त्यामुळे देशातील दोन प्रमुख पक्षांचे अध्यक्ष संसदेच्या दोन वेगवेगळ्या सभागृहांमध्ये दिसून येतील.