शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Unemployment: चिंताजनक! सणासुदीच्या काळामध्ये 54.6 लाख लोक बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 09:07 IST

सीएमआयईच्या अहवालातून झाले स्पष्ट. देशातील रोजगाराच्या स्थितीचा मासिक आढावा सीएमआयईने एका अहवालाद्वारे जारी केला आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये  ४०६.२४ दशलक्ष लोकांकडे रोजगार होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऑक्टोबरमध्ये देशातील तब्बल ५४.६ लाख लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी’ने (सीएमआयई) जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. ऐन सणासुदीच्या हंगामात लोकांकडे रोजगार नसणे ही चिंताजनक बाब आहे. 

देशातील रोजगाराच्या स्थितीचा मासिक आढावा सीएमआयईने एका अहवालाद्वारे जारी केला आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये  ४०६.२४ दशलक्ष लोकांकडे रोजगार होता. ऑक्टोबरमध्ये हा आकडा घटून ४००.७७ दशलक्ष झाला. राष्ट्रीय श्रमशक्ती सहभागिता दर सप्टेंबरमध्ये ४०.६६ टक्के होता. तोही ऑक्टोबरमध्ये घटून ४०.४१ टक्के झाला. 

सीएमआयईने म्हटले की, सणासुदीच्या हंगामात रोजगारात वाढ होईल, असा अंदाज होता. तथापि, तसे होऊ शकले नाही. रिटेल क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे भाकित काही सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आले होते. तथापि, तसे होताना दिसून आले नाही. जानेवारीमध्ये देशाचा बेरोजगारीचा दर ६.५२ टक्के होता. त्यात खेड्यातील बेरोजगारी ५.८१ टक्के आणि शहरातील बेरोजगारी ८.०९ टक्के होती.

शहरापेक्षा ग्रामीण भागातील दर जास्तरोजगाराच्या बाबतीत शहरातील स्थिती तुलनेने चांगली असून, ग्रामीण भागातील स्थिती वाईट आहे. ऑक्टोबरमध्ये शहरातील बेरोजगारी १.२४ टक्क्यांनी घटली आहे. ग्रामीण भागात मात्र बेरोजगारीचा दर १.७५ टक्क्यांनी वाढला आहे. ऑक्टोबरमध्ये देशातील एकूण बेरोजगारीचा दर वाढून ७.७५ टक्के झाला. सप्टेंबरमध्ये तो ६.८७ टक्के होता. बेरोजगारीत वाढ होण्याचा दर शहरात घसरून ७.३८ टक्के झाला. हा तीन महिन्याचा नीचांक आहे. ग्रामीण भागात मात्र तो वाढून ७.९१ टक्के झाला असून, हा चार महिन्याचा उच्चांक आहे.

टॅग्स :jobनोकरी