शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक!  नक्षली हिंसाचारामुळे दहा वर्षांत देशाने गमावले 1150 जवान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 14:06 IST

गेल्या दहा वर्षांमध्ये राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सुरक्षा दलांचे सुमारे 1150 जवान शहीद झाले आहेत, तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले आहेत.

गडचिरोली -  बुधवारी गडचिरोलीमधील कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने जवानांचे पथक जात असताना नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटामध्ये क्यूआरसीच्या 15 जवानांसह 16 जणांचा मृत्यू झाला होता. नक्षलवाद्यांनी आपल्या प्रभाव क्षेत्रात घडवून आणलेला हा काही पहिलाच हल्ला नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सुरक्षा दलांचे सुमारे 1150 जवान शहीद झाले आहेत, तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले आहेत.पश्चिम बंगालमधील नक्षलवाडी येथून सुरू झालेला नक्षलवाद आता देशातील 11 राज्यांमधील 90 जिल्ह्यांत फोफावला आहे. सरकार आणि सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हातात घेतली असली तरी नक्षली हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होत आहे. गेल्या सात वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सुरक्षा दलांच्या होणाऱ्या जीवितहानीमध्ये घट झाली असती तरी छत्तीसगडमधील दंडेवाडा आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी नक्षलवाद्यांनी आपले प्रभावक्षेत्र कायम राखले आहे. गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही काळात देशात झालेल्या मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांचा घेतलेला आढावा.  9 एप्रिल 2019 -  दंतेवाडा येथे भाजपा आमदार भीमा मंडावी यांची भूसुरुंग स्फोट घडवून हत्या, मंडावी यांच्यासोबत चार जवानही शहीद, तर 4 एप्रिल रोजी बस्तर येथे बीएसएफच्या जार जवानांची हत्या12 मार्च 2018 -  छत्तीसगडमधील सुकमा येथे सीआरपीएफच्या 212 बटालियनच्या जवानांवर हल्ला, 9 जवान शहीद मे 2018 - दंतेवाडा येथे छत्तीसगड आर्म फोर्सचे 7 जवान शहीदजून 2018 - झारखंड जग्वार फोर्सचे सहा जवान शहीद23 सप्टेंबर 2018 - विशाखापट्टणम येथे टीडीपी आमदार किदारी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी यांची हत्या 30 ऑक्टोबर 2018 - छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे दूरदर्शनचे कॅमेरामन आणि दोन पोलिसांची हत्या  23 मे 2013 - छत्तीसगडमधील सुकमा येथे काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला, विद्याचरण शुक्ल, महेंद्र कर्मा, नंदकुमार पटेल या दिग्गज नेत्यांसह 25 जणांचा मृत्यू 6 एप्रिल 2010 - छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील चिंतलनार जंगलात सीआरपीएफच्या 75 जवानांसह 76 जणांची हत्या10 एप्रिल 2010 - ओदिशामधील कोरापूट जिल्ह्यात पोलिसांच्या बसवर हल्ला, 10 जवान शहीद, 16 जखमी  23 मार्च 2010  - बिहारच्या गया जिल्ह्यात स्फोट घडवून रेल्वे मार्ग उडवला, त्याच दिवशी हावडा मुंबई रेल्वे मार्गावरही स्फोट घडवला 15 मार्च 2010 - पश्चिम बंगालमधील सिल्दा येथे पोलीस तळावर हल्ला 24 जवान शहीद   8 ऑक्टोबर 2009 - गडचिरोली येथील लाहिडी पोलीस ठाण्यावर हल्ला,  17 पोलीस शहीद  गडचिरोली जिल्ह्यात नक्षली कारवायांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 2010 - 432011 -652012 - 362013 - 432014 - 302015 - 162016 -222017 -242018 - 58 2019 - 20 (आतापर्यंत)  

टॅग्स :naxaliteनक्षलवादीIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रGadchiroliगडचिरोली