शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

अर्जेंटिनातील विश्व योग स्पर्धेत नेहर्नचा ‘सुवर्ण चौकार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:21 IST

आर्टिस्टिक योगा हा नेहर्नचा कसलेला विषय आहे. यातील त्याचे सादरणीकरणातील कौशल्य अनेकांना प्रभावित करते. 

पणजी : अर्जेंटिना येथे झालेल्या २६व्या विश्व योगा चॅम्पियनशीपमध्ये गोव्याच्या मास्टर नेहर्न आचार्य याने चार सुवर्णपदकांची कमाई केली. अत्यंत लवचिक आणि तितकाच तीक्ष्ण असलेल्या नेहर्न याने स्पर्धेत अनेकांची मने जिंकली. त्याच्या सादरीकरणालाही उत्कृष्ट दाद मिळाली. ६ ते ८ मे दरम्यान ही स्पर्धा झाली. नेहर्न हा आंतरराष्ट्रीय योगपटू असून तो लिटील पेन्ग्वीन, हेडगेवार हायस्कूल, पीपल्स हायस्कूल आणि धेंपे उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. त्याने स्पर्धेत योगासन, आर्टिस्टिक योगा डिस्प्ले या प्रकारात भाग घेतला होता.  नेहर्नने राष्ट्रीय, फेडरेशन चषक, आशियाई चॅम्पियनशीप, आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीप तसेच उरूग्वे, इटली, अर्जेंटिना, रशिया, थायलंड आणि मलेशिया येथे झालेल्या विश्व चॅम्पियनशीपमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.  आर्टिस्टिक योगा हा नेहर्नचा कसलेला विषय आहे. यातील त्याचे सादरणीकरणातील कौशल्य अनेकांना प्रभावित करते. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही विश्व योगा स्पर्धेत नेहर्नने त्याने ४ सुवर्ण मिळवले होते. याच इतिहासाची त्याने पुनरावृत्ती केली. २००७ ते २०१७ दरम्यान नेहर्न याने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली आहेत. सध्या तो एनआयटीटीई येथे फिजिओ आणि योगाचा अभ्यास करीत आहे. त्याने विद्यापीठातर्फे २८ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्य पदके पटकाविली आहेत. त्याला योगा फेडरेशन ऑफ इंडियाचे अशोक कुमार अग्रवाल यांचे पूर्ण सहकार्य मिळत असून ते त्याच्या कौशल्यावर प्रभावित आहेत. मंगलोर येथील वेणू गोपाल आचार्य हे नेहर्नचे कोरियोग्राफर असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो आपल्या सादरीकरणाने छाप सोडत आहे. दरम्यान, आतापर्यंत ३२ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई करणाऱ्या नेहर्नच्या यशात योगा असोसिएशन आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाचा महत्त्वाचा वाटा आहे. नेहर्नने या दोघांचेही आभार व्यक्त केले. तसेच आतापर्यंत सहकार्य आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक, आई-वडिलांचाही तो आभारी आहे. त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

अपेक्षेनुसार यश : नविन आचार्यआर्टिस्टिक हा योगप्रकार अर्जेंटिनातूनच सुरू झाला आहे. त्यामुळे अर्जेंटिनाच्या योगपटूंना नमवून सुवर्ण मिळवणे, खूप अभिमानास्पद अशी बाब आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नेहर्न मेहनत करत आहे. त्याच्याकडून मला चार पदकांची आशा होती. त्याने ती पूर्ण केली. यापेक्षा मोठी समाधानाची बाब होऊ शकत नाही. मला आनंद वाटतोय, असे नेहर्नच्या वडिलांनी सांगितले.

टॅग्स :YogaयोगSportsक्रीडा