शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

World Polio Day : पालकांना माहिती असाव्यात पोलिओसंदर्भातील या महत्त्वाच्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 19:43 IST

World Polio Day : पाच वर्षांपर्यंत मुलांना पोलिओ ड्रॉप देणे आवश्यक असते, हे सर्वच पालकांना माहिती आहे.

पाच वर्षांपर्यंत मुलांना पोलिओ ड्रॉप देणे आवश्यक असते, हे सर्वच पालकांना माहिती आहे. मात्र यासंदर्भातील काही प्रश्नांमुळे ते संभ्रमात असतात. आई-वडिलांची हीच समस्या दूर करण्यासाठी 24 ऑक्टोबरला जागतिक पोलिओ दिवस साजरा केला जातो. मुलांना पोलिओ डोस देणे का आवश्यक आहे, हे जाणून घेऊया 

1. पोलिओ ड्रॉप म्हणजे काय असते?पोलिओ हा व्हायरल इंफेक्शनमुळे होणारा असा आजार आहे, जो ठीक होत नाही. या संसर्गापासून आपल्या मुलांचं रक्षण व्हावं यासाठी मुलांना पोलिओचा डोस द्यावा. या आजाराचा व्हायरस लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात पसरतो. 

2. कोणत्या वयात द्यावा पोलिओ ड्रॉप? नवजात बाळापासून ते  5 वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओचा डोस देण्यात यावा. वेळेनुसार आणि न चुकता हा डोस मुलांना द्यावा. निष्काळजीपणा करू नये. या डोसमुळे तुमच्या मुलांच्या आयुष्याचे गंभीर आजारापासून संरक्षण केले जाते. त्यामुळे अगदी नियमानं पोलिओ डोस द्यावा.

3. शरीरावर कसा होऊ शकतो परिणाम?पोलिओचा व्हायरस स्नायूंना कमकुवत बनवतो, यामुळे मुलांच्या अवयवांची हालचाल होत नाही. अधिकतर मुलांचे पाय आणि डोक्यातील स्नायूवर व्हायरस आक्रमण करतो. पोलिओमध्ये मुलांना डोकेदुखी, हात-पाय दुखण्याचा त्रास होतो. 70 टक्के प्रकरणांमध्ये पोलिओची लक्षण दिसून येत नाहीत आणि हा आजार केवळ पोलिओ इंजेक्शनमुळेच दूर होऊ शकतो. 

4. पोलिओ ड्रॉपमुळे संपूर्ण संरक्षण मिळणार?हो, पोलिसाचा एक ड्रॉप मुलांना पोलिओचा संसर्ग होण्यापासून संरक्षण करतो.  पोलिओपासून मुलांचा बचाव करण्यासाठी ओरल पोलियो वॅक्सिन दिले जाते, यामुळे बाळ पोलिओपासून पूर्णतः सुरक्षित राहते.

5. जुलाब-उलट्यांचा त्रास झाल्यास ड्रॉप पाजावा?मुलांना ताप, उलट्या, जुलाबाचा त्रास होत असल्यास पोलिओचा ड्रॉप पाजावा की नाही?,असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. तर पालकांनो घाबरुन न जाता आपल्या पाल्याला पोलिओचा डोस पाजावा. कोणत्याही परिस्थितीत मुलांना पोलिओचा डोस देता येतो. 

6. नवजात बाळाला पोलिओचा डोस पाजावा का?नवजात बाळासाठीही पोलिओचा डोस आवश्यक आहे. नवजात बाळाला पोलिओचा डोस पाजल्यास कोणतेही दुष्पपरिणाम होत नाहीत. 

7. पोलिओ लसीकरण कसे करावे?मुलाच्या जन्मानंतर सहाव्या, दहाव्या आणि चौदाव्या आठवड्यात लसीकरण करावे.  16 ते 24 महिन्याच्या बाळाला बूस्टर डोस द्यावा. याव्यतिरिक्त जेव्हाही सरकारद्वारे पोलिओ अभियान चालवण्यात येईल, त्यावेळेसही हा ड्रॉप नक्की पाजावा. 

टॅग्स :Healthआरोग्यnew born babyनवजात अर्भकHealth Tipsहेल्थ टिप्स