स्वीटहोममध्ये काम करणार्या पर
By Admin | Updated: August 11, 2015 22:11 IST2015-08-11T22:11:40+5:302015-08-11T22:11:40+5:30
प्रांतीय

स्वीटहोममध्ये काम करणार्या पर
प रांतीय बाल कामगाराला मारहाणबारामती । दि. ११ (प्रतिनिधी) बारामती एमआयडीसीत स्वीट होममध्ये काम करणार्या परप्रांतीय बाल कामगाराला मारहाण करणार्या मालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. स्वीट होममध्ये १३ वर्षीय मुलगा बाल कामगार म्हणून काम करीत आहे. या मुलाला मारहाण केल्यानंतर मालकाला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, या बाल कामगाराच्या भावाने या प्रकरणी तक्रार देणार नाही, आम्हाला गावी जाऊ द्या, अशी पोलिसांकडे विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित स्वीटहोम मालकाला समज देऊन बाल कामगाराला गावी जावू देण्याची सूचना केली, असे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले.