नि:पक्षपणे काम करीन : नव्या सभापतींची ग्वाही
By Admin | Updated: March 23, 2017 17:18 IST2017-03-23T17:18:39+5:302017-03-23T17:18:39+5:30
पणजी : विधानसभेतील 80 टक्के सदस्य हे माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवानेही ज्येष्ठ आहेत, याचे मला भान आहे. मी नि:पक्षपणे सभागृहाचे कामकाज हाताळीन, अशी ग्वाही सभापतीपदी निवडून आल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेस दिली.

नि:पक्षपणे काम करीन : नव्या सभापतींची ग्वाही
प जी : विधानसभेतील 80 टक्के सदस्य हे माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवानेही ज्येष्ठ आहेत, याचे मला भान आहे. मी नि:पक्षपणे सभागृहाचे कामकाज हाताळीन, अशी ग्वाही सभापतीपदी निवडून आल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेस दिली.साखळीचे भाजपचे आमदार असलेले सावंत 20 विरुद्ध 15 मतांच्या फरकाने विजयी झाले. सभापतीपदाची प्रतिष्ठा आणि शान मी राखीन. कोठंबी-पाळी येथील ग्रामीण भागातून मी आलो व विधानसभेत पोहोचलो. आज सभापतीही बनलो आहे. दोन वेळा साखळी मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून दिले. मी विधानसभेच्या पवित्र सभागृहाचा मान राखीन, असे सावंत म्हणाले.विधानसभेतील नव्या आणि जुन्या सदस्यांसाठी सातत्याने प्रशिक्षण आयोजित केले जाईल, असेही सभापतींनी सांगितले. जनसंघाचे संस्थापक स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या दोन ओळीही सभापतींनी हिंदीतून उद्धृत केल्या.बुधवारी विधानसभेचे कामकाज सुरू झाले आणि हंगामी सभापती सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. काँग्रेसतर्फे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता. हंगामी सभापतींनी मतदान पुकारले. त्या वेळी रेजिनाल्ड सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपचे आमदार नीलेश काब्राल हेही रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीमुळे सभागृहात पोहोचले नव्हते. त्यामुळे या दोघांच्या अनुपस्थितीत मतदान पार पडले. भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने सगळे सत्ताधारी उभे राहिले. राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव हे उभे राहिले नाहीत. काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजूनेही चर्चिल उभे राहिले नाहीत. शेवटी 20 विरुद्ध 15 मतांनी सभापतीपदी आमदार सावंत निवडून आले.मुख्यमंत्री मनोहर र्पीकर व विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी सभापतींचे अभिनंदन केले. तुम्ही अनुभवी आहात व त्यामुळे कामकाज व्यवस्थित हाताळाल, असा विश्वास र्पीकर यांनी व्यक्त केला. तुम्ही सर्वांना विधानसभेत बोलण्याची व मतदारसंघांचे प्रश्न मांडण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा कवळेकर यांनी व्यक्त केली व सभापतींच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.रवींकडून निषेधआम्हाला सभापतींच्या अभिनंदनासाठी बोलण्यासाठी परवानगी हवी होती; पण तुम्ही ती दिली नाही. याबाबत मी निषेध नोंदवतो, असे काँग्रेसचे आमदार रवी नाईक म्हणाले. तुम्ही पहिल्या दिवशीच लोकशाहीचा खून करू नका, असेही ते म्हणाले. मी तुमचे अभिनंदन मान्य करतो; पण तुम्ही बोलण्यासाठी परवानगी मागितली आहे, हे मी नवा असल्याने माझ्या लक्षात आले नाही. सर्वांच्या सहकार्याची मला अपेक्षा आहे. सभापती म्हणून शिकण्यासाठी थोडे दिवस जातील, असे सावंत म्हणाले. (खास प्रतिनिधी)