जलवाहिनीचे काम सुरू; कॉलेजरोड बंद
By Admin | Updated: May 11, 2014 00:35 IST2014-05-11T00:35:30+5:302014-05-11T00:35:30+5:30
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत पंचवटीत वाढीव पाणीपुरवठ्याची कामे करण्यात येणार असून, त्या अंतर्गत बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथून मोठी जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रारंभ झाला. त्यामुळे कॉलेजरोडवर बीवायके कॉलेजजवळील काही भागावरील वाहतूक वळवण्यात आली.

जलवाहिनीचे काम सुरू; कॉलेजरोड बंद
न शिक : सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत पंचवटीत वाढीव पाणीपुरवठ्याची कामे करण्यात येणार असून, त्या अंतर्गत बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथून मोठी जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रारंभ झाला. त्यामुळे कॉलेजरोडवर बीवायके कॉलेजजवळील काही भागावरील वाहतूक वळवण्यात आली.महापालिकेच्या वतीने पंचवटीतील नीलगिरी बाग येथे ५० दशलक्ष लिटर्स क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येत आहे. त्यासाठी थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठ्याच्या कामाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथून ९०० मी. मी. व्यासाची जलवाहिनी कॉलेजरोडवरून गंगापूररोड आणि तेथे गोदावरी नदी क्रॉसिंग करून ही जलवाहिनी रामवाडीमार्गे नीलगिरी बाग येथे नेली जाणार आहे. या कामाला प्रारंभ झाला असून, बीवायके महाविद्यालयाच्या चौकात कामे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मोची मॉलपासून बीवायकेकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. मध्यंतरी शहराच्या मध्यवस्तीत पालिकेच्या वतीने काम करण्यात येत असताना हे काम अनेक महिने रेंगाळल्यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा झाला होता. कॉलेजरोडसारख्या मध्यवस्तीत मात्र ही कामे वेळेत पूर्ण करण्याची गरज असून, तसे न केल्यास वाहतुकीची कोंडी होणार आहे.