निर्भयाचा तो गुन्हेगार सध्या करतोय हे काम

By Admin | Updated: May 6, 2017 07:07 IST2017-05-06T07:07:21+5:302017-05-06T07:07:21+5:30

या क्रूरकृत्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने याआधीच सहिसलामत सुटला होता. हा आरोपी अल्पवयीन असल्याचे

This work is done by Nirbhaya, the culprit | निर्भयाचा तो गुन्हेगार सध्या करतोय हे काम

निर्भयाचा तो गुन्हेगार सध्या करतोय हे काम

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयाने चार आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. मात्र या क्रूरकृत्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने याआधीच सहिसलामत सुटला होता. हा आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आल्यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात झाली होती. तेथे तीन वर्षांची शिक्षा भोगल्यावर त्याची मुक्तता करणायात आली होती.
निर्भया बलात्कार प्रकरणातील हा आरोपीही तितकाच दोषी असल्याने त्याच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत होती. मात्र कायद्यातील पळवाटेमुळे तो सहीसलामत सुटला होता. दरम्यान, बालसुधारगृहातील शिक्षा भोगल्यावर त्याला अत्यंत गोपनीय पद्धतीने मुक्त करण्याता आले होते. हा आरोपी 23 वर्षांचा झाला असून, सुरक्षेच्या कारणावरून त्याला भारतात गुप्त ठिकाणी रवाना करण्यात आले होते. आता तो एका रेस्टॉरंटमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत असल्याचे समोर आले आहे. मात्र तो कुठे काम करत आहे, याची माहिती मात्र गुप्त ठेवण्यात आली आहे.
१६ डिसेंबर, २०१२ च्या रात्री ही दुर्दैवी आणि अत्यंत लज्जीत करणारी घटना घडली होती. शिक्षेवर शिक्कामोर्तब करताना, न्यायमूर्ती दीपक मिश्रा, आर. भानुमती आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने म्हटले की, या घटनेने संपूर्ण देशभर संतापाची त्सुनामी निर्माण झाली व तो बलात्कार आणि हत्या ही अत्यंत क्रूर व दुर्मीळातील दुर्मीळ घटना होती. जिल्हा न्यायालयाने चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. हा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानेही कायम ठेवला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठानेही योग्य ठरवले.

Web Title: This work is done by Nirbhaya, the culprit