शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

भाजपा नागरिकत्व ठरवू शकत नाही, NPR फॉर्म भरणार नाही - अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 20:17 IST

'देशाची अर्थव्यवस्था अतिदक्षता विभागात गेली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे'

लखनऊ : केंद्र सरकारने आता देशात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधक आणखीनच आक्रमक झाले असून या मुद्द्यावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपावर निशाणा साधला.

एनपीआरचा फॉर्म भरणार नाही. आपण भारतीय नागरिक आहोत की नाही, हे भाजपा ठरवू शकत नाही. आम्हाला रोजगार पाहिजे, एनपीआर नको. देशाची अर्थव्यवस्था अतिदक्षता विभागात गेली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे, असे सांगत अखिलेश यादव यांनी भाजपावर हल्लाबोल केला. याशिवाय, आम्ही एनआरसी आणि एनपीआर फॉर्म भरणार नाही, तर महात्मा गांधींनी आपल्या पहिल्या आंदोलनात कागदपत्रे जाळली होती. आपणही तसेच करायचे, असे आवाहन अखिलेश यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांना केले.

याचबरोबर, भाजपा सरकार जनतेला घाबरत आहे. त्यामुळे भाजपा सत्य काय आहे, ते जनतेपर्यंत पोहचू देत नाही. देशात अन्याय खूप वाढला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा दिला जात नाही. सीएए आणि एनआरसीच्या विरोधातील आंदोलनादरम्यान अनेक निर्दोष लोकांचा मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाईकांना समाजवादी पार्टीकडून मदत करण्यात येईल, असेही यावेळी अखिलेश यादव यांनी सांगितले. 

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे.  

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी