शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020: मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार? निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 13:18 IST

मुलींचं लग्नाचं वय वाढवलं जाण्याची शक्यता; अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांचे संकेत

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना मुलींच्या लग्नाचं वयात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. मुलींच्या पोषणाच्या दृष्टीकोनातून त्यांचं लग्नाचं वय बदलण्यात येईल, असे संकेत सीतारामन यांनी दिले. यासाठी एका कृती दलाची स्थापना करण्यात येणार असून त्यांच्याकडून याबद्दलचा आढावा घेण्यात येईल. त्यामुळे सरकारकडून लवकरच मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मुलींचे विवाह, त्यांचं पोषण आणि आरोग्यावर निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना भाष्य केलं. 'आधी वयाच्या १५ व्या वर्षी मुलींचे विवाह व्हायचे. १९७८ मध्ये शारदा कायदा आणून त्यात बदल करण्यात आला. यानंतर मुलींच्या लग्नाचं वय १८ वर्षे करण्यात आलं. मुलींच्या शारीरिक पोषणाच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला. याच अनुषंगानं सरकारकडून एका कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्याकडून याबद्दलचा पुनर्विचार केला जाईल,' असं सीतारामन यांनी म्हटलं.पोषणाशी संबंधित योजनांवर ३५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचं सीतारामन यांनी जाहीर केलं. 'मातांच्या आरोग्यासाठी पोषण अतिशय गरजेचं आहे. लहान मुलांसाठीदेखील हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याबद्दलची माहिती देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात आले आहेत. सहा लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका पोषण अभियानावर काम करत आहेत,' असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजनेला उल्लेखनीय यश मिळालं आहे. शाळेत जाणाऱ्या मुलींचं प्रमाण वाढलं आहे. हे प्रमाण मुलांपेक्षाही जास्त आहे. मुली कोणत्याही क्षेत्रात मुलांपेक्षा कमी नाहीत, असं सीतारामन पुढे म्हणाल्या.

टॅग्स :budget 2020बजेटNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनmarriageलग्नHealthआरोग्य