शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री - पुरुष कामगारांचा शेती महामंडळावर मोर्चा

By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST

विविध मागण्यांसाठी शेतमजुरांचा मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागपुणे : चवथ्या व पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, ८१ कोटींची थकीत देय रक्कम द्यावी, समान कामास समान वेतन दिले जावे, ५ वर्षांचा बोनस दिला जावा, या व अशा मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध जिल्ह्यांतील स्त्री - पुरुष शेतमजुरांनी शेती महामंडळाचा परिसर ...


विविध मागण्यांसाठी शेतमजुरांचा मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग
पुणे : चवथ्या व पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, ८१ कोटींची थकीत देय रक्कम द्यावी, समान कामास समान वेतन दिले जावे, ५ वर्षांचा बोनस दिला जावा, या व अशा मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध जिल्ह्यांतील स्त्री - पुरुष शेतमजुरांनी शेती महामंडळाचा परिसर आज दणाणून सोडला.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार लढा कृती समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा आयोजिण्यात आला होता. चतु:श्रुंगी मंदिरापासून हा मोर्चा शिवाजीनगर परिसरातील शेती महामंडळाच्या आवारात आला. आनंद वायकर, सुभाष कुलकर्णर, पोपट मिटकरी, सुभाष गुरव, नारायण महानोर आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. शेती महामंडळाच्या मालकीचे चौदा मळे राज्यात असून त्यावर काम करणा-यांपैकी नगर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांतील स्त्री - पुरुष शेतमजुर मोठ्या संख्येने आंदोलनासाठी वाहनांतून आले होते.
२००८ ते १२/१३ या दरम्यानचा ५ वर्षांचा बोनस दिला जावा, घरभाडेवाढीस दिलेल्या स्थगितीची अंमलबजावणी करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑगस्ट २०११ चा पगार द्यावा, रिक्त जागा भराव्यात, संयुक्त शेतीला दिलेली जमीन परत घ्यावी, कामगारांना पाच एकर जमीन व राहण्यासाठी दोन गुंठे जागा द्यावी, निलंबित कामगार प्रतिनिधी व अधिका-यांना कामावर घ्यावे आदी मागण्यांचा उहापोह या कामगारांच्या नेत्यांनी भाषणांमध्ये केला. आनंद वायकर, सुभाष कुलकर्णर, सुभाष काकुस्ते, भालचंद्र शिंदे, यांचा त्यात समावेष होता.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, तुकारामबुवा जगताप,अशोक पवार,
दलित पंॅथर्सचे कार्याध्यक्ष घन:श्याम शेलार यांनी कामगारांना पाठिंबा व्यक्त केला. कायद्यातील तरतूदीनुसार जमीन ताब्यात येईपर्यंत महिलांनी आंदोलनात सक्रीय राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
व्यवस्थापकीय संचालकांनी संघटनेतील कामगार व पदाधिका-यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करत व्यवस्थापकीय संचालकांनाच हटविण्याची मागणी आंदोलकांनी केली.