जेसीबीपुढे उभ्या ठाकल्या महिला

By Admin | Updated: August 11, 2015 22:11 IST2015-08-11T22:11:37+5:302015-08-11T22:11:37+5:30

Women standing in front of JCB | जेसीबीपुढे उभ्या ठाकल्या महिला

जेसीबीपुढे उभ्या ठाकल्या महिला

> विरोधामुळे पथक परतले : बिल्डरची जागा बळकावल्याची तक्रार
नागपूर :ं मौजा- परसोडी सुभाषनगर येथील अतिक्रमण हटविण्यासाठी नासुप्रचे पथक मंगळवारी दुपारच्या सुमारास पोहचले. परंतु सात-आठ महिला जेसीबीपुढे उभ्या ठाकल्या. विरोध वाढल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. महिला पोलीस नसल्याने पथक ाला कारवाई न करता परतावे लागले.
परसोडी येथे सुभाषनगर गृहनिर्माण समस्या निवारण संस्थेच्या प्लॉट क्र. १ मध्ये मागील अनेक वर्षापासून गोविंदराव नागोसे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या प्लाट शेजारी शेवाळकर बिल्डर यांच्या चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. नागोसे यांनी त्यांच्या जागेवर १० फूट अतिक्रमण केल्याची तक्रार आहे तसेच नासुप्रची अनुमती न घेता बांधकाम सुरू आहे. वास्तविक न्यायालयाने बांधकाम थांबविण्याचे निर्देश दिले आहे.
नागोसे यांना नासुप्रने नोटीस बजावली होती. त्यानंतरही बांधकाम सुरू असल्याची तक्रार नासुप्रकडे करण्यात आली होती. त्यामुळे विभागीय अधिकारी दुर्र्गेश गौर, अभय वासनिक यांच्या नेतृत्वात पथक घटनास्थळी पोहचले. परंतु काही महिला जेसीबीपुढे उभ्या ठाकल्या. त्यांनी कारवाईला विरोध दर्शविला.
नंतर पथकाने आपला मोचां मौजा टाकळी सीम येथील अध्यापक गृहनिर्माण सहकारी संस्थेकडे वळविला. संस्थेच्या जमिनीवर काही लोकांनी ताराचे कुंपण घालून रस्ता बंद केला होता. पथकाने रस्ता खुला केला. (प्रतिनिधी)

Web Title: Women standing in front of JCB