अय्यप्पा मंदिरासाठी वयाचा दाखला महिलांना आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:34 IST2018-01-05T01:33:41+5:302018-01-05T01:34:00+5:30
आपले वय १० ते ५० वर्षांदरम्यान नाही, हे सिद्ध करण्यासाठी केरळमधील शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश करू इच्छिणा-या महिलांना लवकरच वयाचा दाखला सोबत न्यावा लागणार आहे.

अय्यप्पा मंदिरासाठी वयाचा दाखला महिलांना आवश्यक
तिरुवनंतपूरम : आपले वय १० ते ५० वर्षांदरम्यान नाही, हे सिद्ध करण्यासाठी केरळमधील शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश करू इच्छिणा-या महिलांना लवकरच वयाचा दाखला सोबत न्यावा लागणार आहे.
भगवान अय्यप्पा ‘नैस्तिक ब्रह्मचारी’ असल्याने या मंदिरात मासिक पाळी येण्याच्या वयाच्या वयोगटातील (१० ते ५० वर्षे) महिलांना अजिबात प्रवेश न देण्याची पूर्वापार प्रथा आहे. तरीही या वयोगटातील महिला मंदिरात प्रवेश करण्याचा आग्रह धरतात. यामुळे या भाविक महिला व मंदिराचे कर्मचारी व पोलीस यांच्यात वादावादी होते. असे अप्रिय प्रकार टाळण्यासाठी महिलांनी आपण प्रतिबंधित वयोगटातील नाही हे खात्रीपूर्वक दाखविण्यासाठी वयाचा मान्यताप्राप्त दाखला सोबत आणावा, असा नियम लवकरच करण्यात येणार आहे.
मंदिराचे व्यवस्थापन करणाºया त्रावणकोर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष ए. पद्मकुमार यांनी सांगितले की, मंदिराच्या प्रथा आणि परंपरांशी तडजोड केली जाऊ शकत नाही.
शंका वाटली म्हणून २६० महिलांना यंदाच्या हंगामात प्रवेश न देता पंबा येथेच अडविण्यात आले. ११ वर्षांची मुलगी १० वर्षांहून कमी वय असल्याचे सांगून प्रवेश घेताना आढळली होती. (वृत्तसंस्था)