शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

इंडिया आघाडीच्या विजयाच्या आशेने पोस्टात महिलांच्या रांगा; ८,५०० रुपये मिळण्याची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 14:47 IST

खाती उघडण्यासाठी महिला लांबच लांब रांगा लावून सकाळपासून उभ्या

बंगळुरु: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये नेहमी रिकामी राहणारी पोस्ट ऑफिसेस सध्या गजबजून गेली आहेत. येथे ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ खाती उघडण्यासाठी महिलांची अभूतपूर्व अशी गर्दी सध्या होत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये खाती उघडण्यासाठी येणाऱ्या महिलांना आशा आहे की, लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर आले तर त्यांच्या खात्यात दरमहा ८,५०० रुपये जमा होतील. सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत; मात्र पोस्ट ऑफिसमध्ये खाती उघडण्यासाठी महिला लांबच लांब रांगा लावून उभ्या आहेत.

खाते उघडले की पैसे...

पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यासाठी आलेल्या एका महिलेने सांगितले की, ती सकाळीच रांगेत उभी होती.  दुसऱ्या महिलेने सांगितले की, तिच्या भागातील प्रत्येकजण खाते उघडल्यापासून पैसे येण्यास सुरुवात होईल, असे सांगत आहे, म्हणून ती देखील खाते उघडण्यासाठी आली आहे. बहुतांश महिला या शिवाजीनगर, चामराजपेठ आणि परिसरातील होत्या. गर्दीमुळे मोकळ्या जागेतही काही काउंटर उघडली आहेत.

अफवा कुणी पसरवली?

  • गेल्या तीन दिवसांपासून ही गर्दी पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या काही आमदारांनी ही अफवा पसरवल्याचे समजते. त्यामुळे महिलांनी पोस्ट कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. या आमदारांनी सांगितले की, इंडिया आघाडीची सत्ता आल्यावर ४ जूननंतर महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होईल.
  • काँग्रेसने केंद्रात सत्तेवर आल्यास महालक्ष्मी योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे, ज्याअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबप्रमुखांच्या खात्यात ८,५०० रुपये थेट जमा केले जातील.

टपाल विभाग त्यांच्या खात्यात २,००० रुपये किंवा ८,५०० रुपये जमा करेल या विश्वासाने लोक  खाती उघडण्यासाठी येत आहेत. मात्र, हे खाते ऑनलाइन व्यवहार किंवा थेट लाभ (हस्तांतरण) योजनेसाठी वापरले जाऊ शकते.-एच. एम मंजेश, मुख्य पोस्ट मास्टर, जीपीओ-बंगळुरु

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीRahul Gandhiराहुल गांधीPost Officeपोस्ट ऑफिस