कोलकाता- कोलंबा एशिया रुग्णालयात एका रुग्णाबरोबर डॉक्टरांकडून हलगर्जी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविरोधात त्या महिला रुग्णाच्या पतीनं रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रारही दाखल केली आहे. महिलेची सर्जरी करत असताना तिला चुकीच्या गटाचं रक्त चढवण्यात आल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.कोलकातातल्या बिधान नगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच त्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. बैशाखी साहा यांच्या पोटात दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 5 जून रोजी त्यांची सर्जरीही झाली. आता त्या रुग्णालयात जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. रुग्णालयात प्रशासनानं A+ रक्तगटाच्या ऐवजी AB+ गटाचं रक्त चढवलं. त्यानंतर बैशाखी साहा यांची प्रकृती खालावत गेली.
धक्कादायक! चुकीच्या गटाचं रक्त चढवल्यानं महिला व्हेंटिलेटरवर, पतीनं रुग्णालयाविरोधात केला गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 16:44 IST