महिलेने केला रिक्षाचालकावर बलात्काराचा प्रयत्न

By Admin | Updated: July 16, 2015 19:42 IST2015-07-16T16:53:45+5:302015-07-16T19:42:48+5:30

दिल्लीत ३२ वर्षाच्या महिलेने रिक्षाचालकावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

The woman tried to rape the rickshaw driver | महिलेने केला रिक्षाचालकावर बलात्काराचा प्रयत्न

महिलेने केला रिक्षाचालकावर बलात्काराचा प्रयत्न

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १६ - दिल्लीत ३२ वर्षाच्या महिलेने रिक्षाचालकावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  रिक्षाचालकाने पहिल्या मजल्यावरुन उडी मारत स्वतःची सुटका करुन घेतली असून याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. 
दिल्लीत रिक्षाचालक म्हणून काम करणारे उमेश प्रसाद (वय ४१ वर्ष) यांना बुधवारी दुपारी साकेत येथून जात होते. या दरम्यान त्यांना अर्जून नगर येथील भाडे मिळाले. रिक्षेत बसलेल्या रेणू लालवानी या महिलेने उमेश प्रसाद यांना काही कामानिमित्त घरी यायला सांगितले. घरी आल्यावर रेणूने दरवाजे बंद करुन घेत उमेश यादव यांच्यावर शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. यादव यांनी नकार दिल्यावर रेणूने यादव यांना मद्यपानासाठी विचारले. मात्र यादव यांनी मद्यपानासही नकार दिल्यानंतर रेणूने यादव यांच्यावर जबरदस्ती केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार रेणू लालवानी यांच्यासोबत असलेली एक महिला शूट करत होती. रात्री उशीरा रेणू व तिची मैत्रीण बोलण्यासाठी दुस-या खोलीत गेल्या असता यादव यांनी पहिल्या मजल्यावरुन उडी मारत थेट पोलिस ठाणे गाठले. याप्रकरपणी पोलिसांनी रेणू लालवानी यांना अटक केली आहे. तर त्यांची मैत्रिण पसार झाली आहे. ती टांझानियाची नागरिक असल्याचे समजते. 

Web Title: The woman tried to rape the rickshaw driver