धक्कादायक! नव-याच्या डोक्यावर बंदूक रोखून महामार्गावर विवाहित महिलेवर बलात्कार, गाडीतून खेचून बाहेर काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 11:04 IST2018-01-23T10:47:32+5:302018-01-23T11:04:51+5:30
एका 22 वर्षीय विवाहित महिलेला गाडीतून खेचून बाहेर काढून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. रात्री उशिरा गुरगावच्या सेक्टर 56 मध्ये ही धक्कादायक घटना घडली.

धक्कादायक! नव-याच्या डोक्यावर बंदूक रोखून महामार्गावर विवाहित महिलेवर बलात्कार, गाडीतून खेचून बाहेर काढले
नवी दिल्ली - दिल्लीजवळ गुरगावमध्ये एका 22 वर्षीय विवाहित महिलेला गाडीतून खेचून बाहेर काढून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. रात्री उशिरा गुरगावच्या सेक्टर 56 मध्ये ही धक्कादायक घटना घडली. पीडित महिलेचा पती आणि दिर तिच्यासोबत असताना ही घटना घडली. आरोपींनी पीडित महिलेचा पती आणि दिराच्या डोक्यावर बंदूक रोखून धरली व तिच्यावर बलात्कार केला. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे.
एक कौटुंबिक कार्यक्रम आटोपून हे तिघे घरी परतत असताना ही घटना घडली. आम्ही दिराच्या गाडीमधून घरी येत होतो. माझ्या पतीला लुघशंका करायची असल्याने आम्ही सेक्टर 56 मध्ये बिझनेस पार्क टॉवरजवळ गाडी थांबवली. त्याचवेळी आणखी दोन गाडया तिथे आल्या व या कारमधल्या लोकांनी गाडी का थांबवली म्हणून विचारणा केली. बोलणे सुरु असताना चौघे गाडीतून उतरले व त्यांनी मला गाडीतून खेचून बाहेर काढले. तिघांनी माझ्या पतीच्या आणि दिराच्या डोक्यावर बंदूक रोखून धरली व चौथ्याने माझ्यावर बलात्कार केला असे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले.
आरोपींनी तिथून निघताना पोलिसांकडे जाऊ नका अन्यथा तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असे या तिघांना धमकी दिली. पीडित महिलेच्या पतीने कसेबसे स्वत:ला सावरत एका गाडीचा रजिस्ट्रेन क्रमांक लिहून घेतला व तडक पोलीस ठाणे गाठले. गुरगावमधील सोनहा येथील जोहलका गावातून पोलिसांनी आरोपींना अटक केली.