महिला केवळ बिछाना गरम करण्यासाठीच उपयुक्त! दक्षिणेतील अभिनेता बरळला

By Admin | Updated: May 24, 2017 13:15 IST2017-05-24T13:15:46+5:302017-05-24T13:15:46+5:30

महिला केवळ बिछाना गरम करण्यासाठीच योग्य असतात, असे लज्जास्पद वक्तव्य दक्षिणेतील एका आघाडीच्या अभिनेत्याने

Woman only suitable for heating the sack! Southern actor Bawalla | महिला केवळ बिछाना गरम करण्यासाठीच उपयुक्त! दक्षिणेतील अभिनेता बरळला

महिला केवळ बिछाना गरम करण्यासाठीच उपयुक्त! दक्षिणेतील अभिनेता बरळला

>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 24 -  महिला केवळ बिछाना गरम करण्यासाठीच योग्य असतात, असे लज्जास्पद वक्तव्य दक्षिणेतील एका आघाडीच्या अभिनेत्याने केले आहे.  चलापती राव असे या अभिनेत्याचे नाव असून, पोलिसांनी महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली सरुखनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  
 
प्रख्यात अभिनेता नागार्जुन याचा मुलगा चैतन्य याचा आगामी तेलुगू चित्रपटाच्या रविवारी झालेल्या ऑडिओ प्रकाशनाच्यावेळी राव याने   महिला या केवळ बिछाना गरम करण्यासाठीच योग्य असतात, असे वक्तव्य केले होते. कार्यक्रमातील सूत्रसंचालकाने महिला या मानसिक शांती भंग करतात का, अशी विचारणा केली असता राव म्हणाला, "तुम्ही असे विचारत असाल तर मी काय म्हणणार,  पण महिला मानसिक शांती भंग करत नाहीत तर सोबत झोपण्यासाठी चांगली असतात." 
 
राव याच्या या वक्तव्यानंतर महिला संघटनांनी आक्रमक भूमिका घेत त्याचा निषेध नोंदवला.  तसेच त्याच्याविरोधात तक्रारही दाखल केली.  त्यानंतर राव याच्याविरोधात पोलिसांना भादंवि कलम 354 अ(4) आणि 509 अन्वये गुन्हा दाखल केला. गेल्या चार दशकांपासून चित्रपटसृष्टीत वावरत असलेल्या रावने अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत.  
 
दरम्यान, राव याचे हे वक्तव्य मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र त्याआधीच रावने एका टीव्ही चॅनेलवर आणि आपल्या फेसबूक लाइव्हवरून झाल्या प्रकाराबाबत माफी मागितली होती.  

Web Title: Woman only suitable for heating the sack! Southern actor Bawalla