शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! ऑफिसच्या छतावर जबरदस्ती तरुणीचा हात पकडून करु लागला हस्तमैथून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 18:02 IST

देशाची राजधानी दिल्लीमधील सर्वात पॉश समजल्या जाणा-या कनॉट प्लेसमध्ये एका महिलेसोबत छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेने आरोप केला आहे की, एका अज्ञात व्यक्तीने ऑफिसच्या छतावर जबरदस्ती तिचा हात पकडला आणि हस्तमैथून करण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देराजधानी दिल्लीमधील सर्वात पॉश समजल्या जाणा-या कनॉट प्लेसमध्ये महिलेसोबत छेडछाडअज्ञात व्यक्तीने ऑफिसच्या छतावर जबरदस्ती हात पकडून हस्तमैथून करण्यास सुरुवात केल्याचा आरोपपोलिसांनी आरोपीविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे

नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीमधील सर्वात पॉश समजल्या जाणा-या कनॉट प्लेसमध्ये एका महिलेसोबत छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेने आरोप केला आहे की, एका अज्ञात व्यक्तीने ऑफिसच्या छतावर जबरदस्ती तिचा हात पकडला आणि हस्तमैथून करण्यास सुरुवात केली. महिलेने पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, 'पीडित महिलेने सांगितलं आहे की, लंचच्या वेळी मी ऑफिसच्या छतावर गेली होती. त्यावेळी एक व्यक्ती पाठलाग करत मागे आला होता'.

पीडित महिलेने दिलेल्या जबाबानुसार, आधी आरोपीने वाईट नजरेने तिला एकटक पाहण्यास सुरुवात केली आणि नंतर तिच्या दिशेने चालत आला. पीडितेच्या जवळ आल्यानंतर त्याने आधी तिच्या शरिराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलने आरोपीला मागे ढकललं आणि दरवाजाच्या दिशेने पळाली. मात्र दरवाजा लॉक केलेला होता. आरोपीनेच दरवाजा लॉक केला होता असा दावा पीडित महिलेने केला आहे. यानंतर आरोपीने पीडित महिलेला पकडलं आणि आपल्या पँटची चेन काढून घाणेरड्या पद्धतीने स्वत:ला स्पर्श करु लागला. 

 

आपण धमकीदेखील दिली, मात्र त्याने काहीच ऐकलं नाही असं पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं आहे. पीडित महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात करताच, आरोपीने तिच्या हातातील फोन खेचून  घेतला आणि दुस-या छतावरुन पळून गेला. पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरु आहे. 

देशभरात गेल्या काही दिवसांपासून महिलांसंबंधी गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ लागल्याचं दिसत आहे. मात्र हे गुन्हे रोखण्यासाठी कठोर पाऊलं उचलली जात नसल्याने रोष व्यक्त होत आहे. याआधी संसद भवनजवळ मेट्रो स्टेशनच्या आत एका महिला पत्रकाराची छेड काढल्याचं प्रकरण समोर आलं होतं. आरोपीने स्टेशनच्या पाय-यांवर महिला पत्रकाराची छेड काढली होती. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली होती. 

टॅग्स :MolestationविनयभंगCrimeगुन्हा