शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्टसाठी महिला पोलीस ठाण्यात गेलेली; पीएसआयच्या पिस्तुलमधून गोळी सुटली, डोक्याला लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 17:42 IST

महिलेला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तिची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. तर या घटनेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसावर कारवाई केली असून त्याला तत्काळ निलंबित केले आहे. 

उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये धक्कादायक दुर्घटना घडली आहे. पासपोर्टच्या कामासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्याला पीएसआयच्या पिस्तुलची गोळी लागली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. एक महिला थेट खाली कोसळल्याचे पाहून सर्व घाबरले होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. 

महिलेला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तिची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. तर या घटनेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसावर कारवाई केली असून त्याला तत्काळ निलंबित केले आहे. 

अलिगढच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील ही घटना आहे. एक महिला पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आली होती. ती पोलीसाच्या टेबलसमोर उभी होती. तेव्हा हा पोलीस त्याची पिस्तुल साफ करत होता. अचानक त्याच्या हातातील पिस्तुलमधून गोळी सुटली आणि थेट त्या महिलेच्या डोक्याला लागली. हे पाहून शेजारच्या व्यक्तीने पडलेल्या महिलेला धावत जात उठविण्याचा प्रयत्न केला, परंतू ती बेशुद्ध पडली होती. पोलिसांनी तिला लगेचच जेएन मेडिकल कॉलेजमध्ये भरती केले आहे. 

या प्रकरणी पोलीस अधिकारी मनोज शर्माला निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीमध्ये एक पोलीस शिपाई पीएसआयला त्याची पिस्तुल आणून देतो. तो ती पिस्तुल घेत इकडे तिकडे रोखून धरतो. याचवेळी अचानक गोळी सुटते आणि बुरखाधारी महिलेला लागते. हे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. यामध्ये पीएसआयची चुकी असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी