शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'तो' वाद विकोपाला गेला; पतीच्या एका शब्दामुळे नाराज झालेल्या पत्नीने कापली जीभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 14:51 IST

Crime News : पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून एका महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. पतीचा एक शब्द जिव्हारी लागल्याने पत्नी खूप नाराज झाली होती.

नवी दिल्ली - पती- पत्नीमध्ये अनेकदा कौटुंबिक कारणांवरून वाद होत असतात. काही वेळा हे वाद विकोपाला देखील जातात अशीच एक घटना आता घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून एका महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. पतीचा एक शब्द जिव्हारी लागल्याने पत्नी खूप नाराज झाली होती. तिने ब्लेडने स्वतःची जीभ कापून रस्त्यावर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बिजनौर जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे. जिल्ह्यातील रसूलपूर नागला गावात हा प्रकार घडला 

मिळालेल्या माहितीनुसार, पती पत्नीमध्ये काही तरी किरकोळ कारणांवरून वाद सुरू झाला. त्यांच्यातील भांडणामध्ये पतीने पत्नीवर ओरडत तिला वाद घालणारी म्हटलं आणि तोच शब्द पत्नीच्या जिव्हारी लागला. पतीच्या शब्दांमुळे दुखावलेल्या पत्नीने धक्कादायक पाऊल उचललं. ब्लेडने आपली जीभ कापून फेकून दिली. आरडाओरडा, गोंधळ सुरू असल्याचं पाहून लोकांनी त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली. या घटनेनंतर तातडीने महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

बबली असं या महिलेचं नाव असून तिच्यावर सध्या अमरोहाच्या धनौरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याला दोन मुलं आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बिकट आहे. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये देखील सतत भांडणं होत होती. यावेळी देखील त्यांचं भांडण झालं आणि पुढे त्यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! सासरी जाणाऱ्या नववधूला लागली तहान; पाणी आणण्यासाठी नवरदेव गेला अन् हैराण झाला

देशात फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सासरी जाणाऱ्या नवरीने नवरदेवालाच गंडा घातल्याची घटना घडली आहे. नववधूने रस्त्यातच तहान लागल्याच कारण देत नवरदेवाला चकवा देत पळ काढला आहे. खूप शोधल्यानंतरही तिचा पत्ताच लागला नाही आणि या फसवणुकाची हा प्रकार उघड झाला. पीडित तरूण आणि त्याच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पसार झालेल्या नववधूचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटल