शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

४४० व्होल्टचा झटका! ना पोल, ना कनेक्शन... ८२ हजारांचं पाठवलं वीज बिल, काय आहे हे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:45 IST

पंचायत सचिवालयाच्या नावाने पोल, वायर, कनेक्शन नसतानाही ८२,३५४ रुपयांचं वीज बिल पाठवण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये वीज विभागाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. पंचायत सचिवालयाच्या नावाने पोल, वायर, कनेक्शन नसतानाही ८२,३५४ रुपयांचं वीज बिल पाठवण्यात आलं आहे. हे धक्कादायक प्रकरण नकूर विधानसभा मतदारसंघातील बहरामपुरा गावाचं आहे.

गावचे सरपंच विक्रम सिंह राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायत भवनाचं बांधकाम २०२३ मध्ये सुरू झाले, पण वीज विभागाने एप्रिल २०२२ पासून बिल लावण्यास सुरुवात केली. आजपर्यंत या ठिकाणी विजेचा खांब किंवा वायर बसवण्यात आलेली नाही, वीज कनेक्शनसाठी अर्ज केला नाही, तरीही विभागाने वीज कनेक्शन सुरू असल्याचा कोणताही तपास न करता खोटा रिपोर्ट सादर केला.

डिसेंबर २०२४ मध्ये जेव्हा पहिल्यांदा माहिती मिळाली की, ७०,६९४ रुपयांचे बिल प्रलंबित आहे, तेव्हा त्यांनी वीज विभागाच्या कार्यालयात पोहोचून या निष्काळजीपणाचा निषेध नोंदवला. असं असूनही, बिलात कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही किंवा अधिकाऱ्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही. बिल सतत वाढत आहे. बिलाची रक्कम ८२,३५४ रुपयांपर्यंत वाढली आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत सरपंचांनी १६ डिसेंबर २०२४ रोजी कार्यकारी अभियंत्याकडे लेखी तक्रार दिली होती की हवेत चालणारे हे कनेक्शन त्वरित बंद करावं असं म्हटलं. परंतु आजपर्यंत विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. विभागाची ही मनमानी आणि भ्रष्टाचार ही ग्रामपंचायतीला हानी पोहोचवण्याचं षड्यंत्र आहे. या अन्यायाविरुद्ध उच्च अधिकाऱ्यांकडे आवाज उठवतील आणि कायदेशीर मार्गही स्वीकारतील असं म्हटलं आहे. तसेच वीज विभागाच्या या निष्काळजीपणामुळे संपूर्ण गावात संताप पसरला आहे. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरUttar Pradeshउत्तर प्रदेश