शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

भारत अध्यक्ष झाल्याने तिसऱ्या जगातील देशांमध्येही विश्वासाची बीजे पेरली गेली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 07:43 IST

नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’चे मुख्य संपादक विजय जोशी आणि वरिष्ठ संपादकांना त्यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी विशेष मुलाखत दिली.

भारताच्या जी-२० अध्यक्षपदाने तिसऱ्या जगातील (थर्ड वर्ल्ड) देशांमध्येही विश्वासाची बीजे पेरली आहेत. हवामान बदल आणि जागतिक संस्थात्मक सुधारणा यांसारख्या अनेक मुद्द्यांवर येत्या काही वर्षांत जगाची दिशा ठरवण्याचा त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’चे मुख्य संपादक विजय जोशी आणि वरिष्ठ संपादकांना त्यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की,  आम्ही अधिक प्रातिनिधिक आणि सर्वसमावेशक प्रणालीकडे त्वरेने वाटचाल करू, जिथे प्रत्येक आवाज ऐकला जाईल. या मुलाखतीचा हा संपादित भाग...

जी-२० अध्यक्षपदाबद्दल काय सांगाल?भारत जेव्हा जी-२०चा अध्यक्ष बनला तेव्हा आमचे शब्द आणि जगासाठीची दृष्टी केवळ कल्पना म्हणून घेतली जात नव्हती, तर भविष्यासाठी दिशादर्शक म्हणून घेतले जात होते. जगाला आवश्यक असलेले अनेक उपाय आपल्या देशात आधीच वेगाने आणि मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे राबवले जात आहेत. भारताच्या जी-२० अध्यक्षपदाचे अनेक सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. त्यातील काही माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेत. भारताच्या जी-२० अध्यक्षपदाने तथाकथित तिसऱ्या जगाच्या देशांमध्येही विश्वासाची बीजे पेरली आहेत. 

जी-२० चे अध्यक्षपद ब्राझीलकडे जाईल, राष्ट्राध्यक्ष सिल्वा यांना काय सल्ला द्याल?कोणत्याही देशाला त्यांच्या जी-२० अध्यक्षपदाच्या काळात काय करावे, याबद्दल सल्ला देणे माझ्यासाठी योग्य ठरणार नाही. प्रत्येकाची स्वत:ची अशी खास ताकद असते आणि त्यानुसार ते पुढे जातात. पुढील वर्षीही आपण ‘ट्रोइका’चा (जी-२० मधील सर्वोच्च गट) भाग असून, जे आपल्या अध्यक्षपदाच्या पलीकडे जी-२० मध्ये निरंतर रचनात्मक योगदान सुनिश्चित करेल.

भारताने आफ्रिकन संघाला जी-२०चा स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा आवाज आंतरराष्ट्रीय मंचावर ऐकला जाणे महत्त्वाचे का आहे?  आफ्रिकेबद्दलची आमची ओढ स्वाभाविक आहे. आफ्रिकेसोबत आमचे शतकानुशतके जुने सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. वसाहतवादाच्या विरोधातील चळवळींचा आपला इतिहास सामाईक आहे. जी-२० मध्येही आफ्रिकेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जी-२०च्या अध्यक्षपदी असताना आम्ही केलेल्या पहिल्या गोष्टींपैकी एक म्हणजे ‘व्हॉइस ऑफ द ग्लोबल साउथ समिट’ आयोजित करणे, ज्यामध्ये आफ्रिकेतून उत्साही सहभाग होता. आमचा असा विश्वास आहे की, पृथ्वीच्या भविष्यासाठी कोणतीही योजना सर्व आवाजांचे प्रतिनिधित्व आणि त्यांच्या मान्यतेशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. निव्वळ उपयुक्ततावादी जागतिक दृष्टिकोनातून बाहेर पडून ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ सूत्र अंगीकारण्याची गरज आहे.

आता तुम्ही जैव-इंधन भागीदारीचा प्रस्ताव देत आहात. त्याचा उद्देश काय आहे?विसाव्या शतकातील आणि २१व्या शतकातील जगामध्ये खूप फरक आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी आपल्या ग्रहाचे संरक्षण आणि जतन करणे ही एक सामाईक जबाबदारी आहे, ज्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. आम्ही भारतात हवामान केंद्रित उपक्रमांमध्ये मोठी प्रगती करत आहोत. अवघ्या काही वर्षांत भारताने आपली सौरऊर्जा क्षमता २० पट वाढवली आहे. पवनऊर्जेच्या बाबतीत भारत जगातील पहिल्या चार देशांमध्ये आहे. इलेक्ट्रिक वाहन क्रांतीमध्ये, भारत नव्या गोष्टी आत्मसात करण्यात आणि त्याचा वापर, या दोन्हीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जी-२० देशांपैकी आम्ही कदाचित पहिले देश आहोत, ज्यांनी त्यांचे हवामान लक्ष्य निर्धारित वेळेच्या नऊ वर्षे आधी गाठले आहे.

चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या श्रीलंका, सुदान आदी देशांना भारत मदत करत आहे का?  कर्जाचे संकट खरोखरच जगासाठी, विशेषतः विकसनशील देशांसाठी चिंतेचा विषय आहे. आमच्या जी-२० अध्यक्षपदाच्या काळात कर्जाच्या गुंतागुंतीमुळे निर्माण झालेल्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जी-२० देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर यांनी कर्ज व्यवहारात चांगली प्रगती झाल्याचे मान्य केले आहे. 

सायबर गुन्ह्यांमुळे मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईची  व्याप्ती वाढली आहे. काय सांगाल? सायबर धमक्या गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. त्यांच्या प्रतिकूल परिणामांचा एक भाग म्हणजे त्यांच्यामुळे होणारे आर्थिक नुकसान. जागतिक बँकेचा अंदाज आहे की, सायबर हल्ल्यांमुळे २०१९- २०२३ दरम्यान, जगाचे अंदाजे ५.२ ट्रिलियन डॉलरचे नुकसान होऊ शकते. सायबर सुरक्षेत जागतिक सहकार्य अपरिहार्य आहे. 

संयुक्त राष्ट्र संघाकडे ‘बोलण्याचे दुकान’ म्हणून पाहिले जात आहे. काय सांगाल? एक वैविध्यपूर्ण राष्ट्र, लोकशाहीची जननी, जगातील सर्वांत मोठ्या तरुण लोकसंख्येपैकी एक आणि जगातील विकासाचे इंजिन म्हणून भारताकडे जगाचे भविष्य घडवण्यात मोठे योगदान आहे. या प्रवासात बदललेल्या जागतिक वास्तविकता, भारताची प्रगती आणि आपल्या आंतरराष्ट्रीय संस्थांमधील सुधारणांची गरज याबद्दल जागरूकता आणि समज विकसित करण्यासाठी माध्यमे दुवा म्हणून काम करतात. 

 २०४७ मध्ये तुम्हाला भारत कुठे दिसतो?  २०४७ पर्यंतचा काळ ही एक मोठी संधी आहे. या युगात असलेल्या भारतीयांना पुढील १००० वर्षे स्मरणात राहील अशा विकासाचा पाया घालण्याची एक अद्भुत संधी आहे. मला खात्री आहे की, नजिकच्या भविष्यात आपण पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असू. माझा विश्वास आहे की, २०४७ पर्यंत आपला देश विकसित देशांमध्ये सामील होईल. आपली अर्थव्यवस्था अधिक समावेशक आणि नावीन्यपूर्ण असेल.

अशी काही क्षेत्रे आहेत का, जेथे आपण आणखी काही करू शकलो असतो, असे तुम्हाला वाटते.आमचे शाश्वत सुपरफूड ‘श्री अन्न’बद्दलची आमची आवड लक्षात घेऊन कृषिमंत्र्यांनी हवामान-स्मार्ट आणि शेतीसाठी डिजिटल दृष्टिकोनाच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करून बाजरी आणि इतर धान्यांवरील संशोधनासाठी एक आंतरराष्ट्रीय उपक्रमही सुरू केला. कामगारशक्तीच्या सहभागातील त्रुटी दूर करण्यासाठी आणि नेतृत्व आणि धोरणात्मक पदांवर महिलांची मोठी भूमिका सुनिश्चित करण्यासाठी मतैक्य निर्माण केले. ऊर्जामंत्र्यांनी हायड्रोजनसाठी उच्चस्तरीय तत्त्वांवर सहमती दर्शविली व जागतिक जैवइंधन आघाडीच्या स्थापनेचा पाया घातला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा