पाशेकोप्रकरणी आदेशामुळे आश्चर्य वाटले -पर्रीकर

By Admin | Updated: May 5, 2015 01:29 IST2015-05-05T01:29:22+5:302015-05-05T01:29:22+5:30

अभियंता मारहाण प्रकरणी सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा झालेले गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको यांच्या शोधासाठी संरक्षणमंत्री

Wishing surprise over the verdict of the PSC | पाशेकोप्रकरणी आदेशामुळे आश्चर्य वाटले -पर्रीकर

पाशेकोप्रकरणी आदेशामुळे आश्चर्य वाटले -पर्रीकर

पणजी : अभियंता मारहाण प्रकरणी सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा झालेले गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको यांच्या शोधासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या शासकीय निवासस्थान परिसरात शोध घेण्याचा आदेश दिला होता. याविषयी पर्रीकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना आश्चर्य व्यक्त केले.
आ. मिकी पाशेको यांचे फरार होणे व मडगावच्या एका न्यायालयाने संरक्षण मंत्र्यांच्याही दिल्लीतील निवासस्थान परिसराची झडती घ्या, अशा आदेशाविषयी त्यांना विचारले. त्यावर पर्रीकर म्हणाले की, न्यायालयीन आदेशबाबत खूप आश्चर्य वाटले. तो आदेश येण्यापूर्वी एक दिवस अगोदर आपण दिल्लीतील घरात प्रवेश केला होता. मडगावच्या न्यायालयाचा तो आदेश वरच्या न्यायालयाने रद्द केल्याने आता मला त्याविषयी काही बोलायचे नाही. पाशेकोंचा शोध न लागणे याच्याशी माझ्या दिल्लीतील घराचा काही संबंध नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Wishing surprise over the verdict of the PSC