कुजबूज--सद्गुरू, 2 जून
By Admin | Updated: June 2, 2014 23:43 IST2014-06-02T23:43:55+5:302014-06-02T23:43:55+5:30
मॅडमची पार्टी

कुजबूज--सद्गुरू, 2 जून
म डमची पार्टीकाँग्रेस पक्षात मॅडम कोण असे विचारले तर सोनिया गांधी यांचे नाव प्रत्येकजण सांगतो. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष र्शीमती गांधी यांना अनेक काँग्रेसजन केवळ मॅडम एवढय़ाच नावाने संबोधतात. गोव्यातील भाजपमध्ये मॅडम कोण असे विचारले तर सहसा कळत नाही; पण गोवा सरकारच्या मंत्रिमंडळातील मॅडम कोण असे विचारले तर लगेच वनमंत्री अँलिना साल्ढाणा यांचे नाव अनेकजण घेतात. अर्थात सोनिया मॅडम व अँलिना मॅडमची तुलना दुरान्वयाने देखील करता येत नाही. र्पीकर मंत्रिमंडळात एकच महिला असल्याने मंत्रिमंडळातील मॅडम म्हणजे अँलिनाताई असे समीकरण झाले आहे. कुठ्ठाळी मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यापासून गेली दोन वर्षे कुठ्ठाळीतील काही प्रमुख भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी आणि अँलिनाताई यांच्यातील अदृश्य राजकीय संघर्ष हा प्रदेश भाजपमध्ये आणि कुठ्ठाळीतही चर्चेचा विषय आहे. या संघर्षाची आता आठवण येण्याचे साधे कारण म्हणजे मॅडमनी ठेवलेली एक पार्टी म्हणजे मेजवानी. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र सावईकर हे विजयी झाल्याने मॅडमनी मेजवानीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सावईकर वगैरे अनेक नेते त्या पार्टीत सहभागी झाले; पण कुठ्ठाळी भाजपचे गटाध्यक्ष वगैरेंना निमंत्रण नव्हते, अशी खुमासदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे कुठ्ठाळीतील प्रमुख पदाधिकारी पार्टीस पोहचले नाहीत. कुठ्ठाळी मतदारसंघात काँग्रेसकडे नेताच नाही, काँग्रेस तिथे विस्कळीत असूनही भाजपला कुठ्ठाळीत अवघ्याच मतांची आघाडी मिळाली. याबाबत काँग्रेसचे आलेक्स रेजिनाल्ड म्हणे खूपच खुश आहेत. मात्र, त्यासाठी आलेक्सने मात्र पार्टी वगैरे ठेवली नाही. पराभूत झाल्यापासून रेजिनाल्डबाब सगळ्य़ाच पाटर्य़ा विसरले आहेत.गुप्त बैठकीची कथागोव्यातील काँग्रेसने प्रथमच एक गुप्त बैठक घेतली. काँग्रेसच्या सात सदस्यीय शिस्तभंग कारवाई समितीच्या बैठकीत सोमवारी बरीच चर्चा झाली. पहिलीच बैठक असल्याने चर्चा रंगली. ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या आहेत. काही आमदारांविरुद्धही तक्रार आहे. काहीजणांविरुद्धच्या तक्रारींबाबत पुरावेही आले आहेत. या पुराव्यांवर विचार करून यापुढे चौकशी कशी पुढे न्यावी ते बैठकीत ठरले आहे. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत पत्रकारांना बैठकीतील कोणतीच माहिती सांगायची नाही, असा एकमेव निर्णय बैठकीत झाला. एरव्ही अशा प्रकारच्या समित्या म्हणजे फार्स असतो. मात्र, या वेळी नाटकबाजी न करता कारवाई केली जाणार आहे.