कुजबूज--7 मार्च सद्गुरू

By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:03+5:302015-03-08T00:31:03+5:30

आग्नेलची खेळी

Wishful - March 7, Sadguru | कुजबूज--7 मार्च सद्गुरू

कुजबूज--7 मार्च सद्गुरू

्नेलची खेळी
रेईश मागूश जिल्हा पंचायत मतदारसंघातील लढत रंगतदार बनली आहे. सांगोल्डा ही अतिरिक्त पंचायत रेईश मागूशमध्ये आहे. आग्नेल फर्नांडिस यांनी रेईश मागूश मतदारसंघात जास्त लक्ष घातल्याने रंगत वाढली. आग्नेलचा पाठिंबा जयेश साळगावकर यांना नाही. आग्नेल काँग्रेसचे नेते असले व साळगावकरही काँग्रेसमध्येच असले तरी, रेईश मागूशमध्ये राजकीय समीकरणे वेगळी आहेत. शायर कुलासो हे रेईश मागूशच्या रिंगणात उतरलेत. त्यांना आग्नेलचा पाठिंबा आहे. साळगावकर यांचा मेहुणा हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याचा पाठिंबा साळगावकर यांना की रूपेश नाईकांना, असा प्रश्न आहे. रूपेश हे भाजपचे उमेदवार असून त्यांच्यासाठी मंत्री दिलीप परुळेकर वावरत आहेत. यामुळेही रंगत वाढली. राजेश दाभोळकरही येथूनच लढत आहेत.
...................
प्रदेशाध्यक्षपदासाठी नावे
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आणखी काही नावे येऊ लागलीत. जो पक्षाचा खर्च करू शकतो, त्यालाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल, असे संकेत राष्ट्रवादीच्या र्शेष्ठींकडून अप्रत्यक्ष येऊ लागल्याने रंगत वाढलीय. माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी जवळजवळ निश्चित आहे; पण पक्षाचे निरीक्षक भास्कर जाधव यांची मान्यता मिळेपर्यंत काही सांगता येत नाही. देवानंद नाईक, अविनाश भोसले यांची नावे यापूर्वी चर्चेत येऊन गेली. राष्ट्रवादीच्या येत्या 14 रोजी होणार्‍या बैठकीवेळी नीळकंठ हळर्णकर यांनी ट्रोजन डिमेलो यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी सुचविले तर कुणी आश्चर्य मानू नये. अनिल जोलापुरे यांचेही नाव काहीजण प्रदेशाध्यक्ष म्हणून घेत आहेत. पक्षासाठी दर महिन्यास एक लाख रुपये खर्चाची तयारी जोलापुरे यांनी ठेवल्याने जाधव यांच्यासमोर जोलापुरे यांचेही नाव काही पदाधिकारी सुचविणार असल्याचे कळते.
......

Web Title: Wishful - March 7, Sadguru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.