कुजबूज--6 जानेवारी सद्गुरू
By Admin | Updated: January 8, 2016 02:13 IST2016-01-08T02:13:57+5:302016-01-08T02:13:57+5:30
मोतीने केली अडचण

कुजबूज--6 जानेवारी सद्गुरू
म तीने केली अडचण..............काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांची उपाध्यक्ष मोती देसाई यांनी मोठीच अडचण केली. फालेरो यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद नको होते; पण फालेरो जर पद सोडून गेले तर आपली अडचण होईल असे मोतींना वाटल्याने त्यांनी फालेरो यांनी पद सोडूच नये, अशी भूमिका घेतली. मोतींनी नुवे, कुंकळ्ळी अशा ठिकाणी काहीजणांना तिकीट देण्याचे आश्वासन दिलेले असावे. फालेरो यांनी प्रदेशाध्यक्षपदी कायम राहावे ही मोतीरावांची इच्छा बरी आहे; पण त्यांनी फालेरो हे नावेलीतून विधानसभा निवडणूक लढवतील असे जाहीर केल्यामुळे फालेरोंची जास्त अडचण झाली. दिल्लीहूनही फालेरोंना फोन आल्याचे कळते. अशा प्रकारे तिकीट जाहीर करता येते का आणि तेही सोनियाजींचे नाव वापरून, असा प्रश्न अनेकांना पडला. कुणीच प्रेसजवळ किंवा मीडियाजवळ बोलायचे नाही, असे मंगळवारीच काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत ठरले होते. मात्र, मोतींनी लगेच मीडियाला पत्रके वाटली, त्याची दखल फालेरो घेणार काय?दीपकची शिरोडा भेट.................कोडार येथे एका हायस्कूलचा मोठा सोहळा पार पडला. कोडार हा गाव शिरोडा मतदारसंघात येतो. म.गो.चे मंत्री दीपक ढवळीकर हे त्या सोहळ्य़ास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ढवळीकर यांनी शिरोड्यातील त्या सोहळ्य़ाला जाऊ नये म्हणून भाजपमधील काहीजणांनी खूप प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी राज्यस्तरावरील काही भाजप पदाधिकारी वावरले; पण आपण मंत्री या नात्याने गोव्यात कुठेही फिरू शकत नाही का, असा प्रश्न दीपकरावांनी काहीजणांना विचारला. ते कोडारच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आले. आता यापुढे पंचवाडी येथील एका कार्यक्रमास ते जाणार आहेत. शिरोड्यातील विविध गावांमधून दीपक ढवळीकर यांना निमंत्रणे कोण देतो, असा प्रश्न काँग्रेसचे नेते सुभाष शिरोडकर यांना देखील पडला आहे. आपण आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत आहोत, असे गेल्या वर्षी सर्वांना सांगणारे भाऊ पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आहेत.............