संसदेचे हिवाळी अधिवेशन जुन्याच इमारतीमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 12:28 IST2022-10-22T12:28:18+5:302022-10-22T12:28:30+5:30

संसदेच्या गेल्या अधिवेशनामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीमध्ये होईल, असा दावा केला होता.

Winter Session of Parliament in old building? | संसदेचे हिवाळी अधिवेशन जुन्याच इमारतीमध्ये?

संसदेचे हिवाळी अधिवेशन जुन्याच इमारतीमध्ये?

नवी दिल्ली: संसदेचे आगामी हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीमध्ये होणार नसून पुढील वर्षी होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या इमारतीत होण्याची शक्यता आहे.

संसदेच्या गेल्या अधिवेशनामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीमध्ये होईल, असा दावा केला होता. नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने पुढील महिन्यात सुरू होणारे हिवाळी अधिवेशन जुन्याच इमारतीमध्ये होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नुकतीच नव्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली.

यावेळी कामावर असलेल्या कामगारांशीसुद्धा लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिकारी व बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली व या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. इमारतीतील अंतर्गत सजावट इतर सुविधांची पूर्तता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले.
 

Web Title: Winter Session of Parliament in old building?

टॅग्स :Parliamentसंसद