Mamata Banerjee Targets Congress: गेल्यावर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले, पण त्यानंतर झालेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांबाबत स्थानिक विरोधी पक्ष सावध भूमिका घेत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (10 फेब्रुवारी 2025) आपल्या सर्व आमदारांची बैठक घेतली.
भाजपसाठी एकटी टीएमसी पुरेशीममता बॅनर्जी म्हणतात, 'दिल्ली निवडणुकीच्या निकालांचा पुढील वर्षी होणाऱ्या बंगाल विधानसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही दोन तृतीयांश बहुमताने स्वबळावर सत्तेवर येऊ. काँग्रेससाठी येथे काहीच उरले नाही. बंगालमध्ये भाजपचा मुकाबला करण्यासाठी तृणमूल काँग्रेस एकटीच पुरेशी आहे. बंगालमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नाही,' असं ममतॅ बॅनर्जी यांनी म्हटले.
...तर निकाल वेगळा लागला असतासूत्रांच्या हवाल्याने असे कळते की, ममता बॅनर्जींनीदेखील कबूल केले की, जर काँग्रेस आणि आपने एकत्र काम केले असते, तर निकाल वेगळे लागले असते. नादिया जिल्ह्यातील टीएमसी आमदार म्हणाले, काँग्रेसला सुमारे 5 टक्के मते मिळाल्याने निकालात फरक पडला. काँग्रेसने थोडी लवचिकता दाखवली असती आणि आम आदमी पक्षासोबत युती केली असती, तर निकाल वेगळे असते. हरियाणात 'आप'ने काँग्रेसला साथ दिली नाही. दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या असत्या, तर हरियाणात भाजप पुन्हा सत्तेवर आला नसता, असे त्यांचे मत आहे.