शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आप- काँग्रेसच्या मतांची बेरीज यावेळी भाजपला दणका देणार?मतांची विभागणी दिल्लीत आतापर्यंत ठरली निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:17 IST

दिल्लीच्या राजकारणात सुंभ जळूनही पीळ न गेलेल्या काँग्रेसशी ‘आप’ने केलेली युती भाजपला शह देण्यात कितपत उपयुक्त ठरते हे या निवडणुकीत दिसणार आहे.

दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी यंदा भाजप, काँग्रेस आणि आप या देशातील तीन राष्ट्रीय पक्षांमध्ये होणारी झुंज लक्षणीय ठरणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीत लोकसभेत भाजपचे, तर विधानसभेत ‘आप’ने वर्चस्व गाजविले आहे. दिल्लीच्या राजकारणात सुंभ जळूनही पीळ न गेलेल्या काँग्रेसशी ‘आप’ने केलेली युती भाजपला शह देण्यात कितपत उपयुक्त ठरते हे या निवडणुकीत दिसणार आहे.

‘आप’ आणि भाजपमध्ये वर्चस्वासाठी जोरदार संघर्ष- दिल्लीत काँग्रेसची मक्तेदारी संपविल्यानंतर ‘आप’ आणि भाजपमध्ये वर्चस्वासाठी जोरदार संघर्ष सुरू आहे. २०१९च्या लोकसभेत भाजपने गेल्या दहा  वर्षातील ५६.८९ टक्के मतांच्या उच्चांकासह सलग दुसऱ्यांदा सातही जागा जिंकल्या.-  त्यावेळी काँग्रेस (२२.५ टक्के) आणि ‘आप’ (१८.१ टक्के) यांच्या मतांच्या बेरजेपेक्षा १६.४९ टक्के मते जास्त मिळवून भाजपचे सर्व उमेदवार विजयी ठरले होते. - २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ‘आप’ (३२.९० टक्के) आणि काँग्रेस (१५.१० टक्के) यांच्या मतांची विभागणी ४६.४० टक्के मतांसह सर्व सात जागा जिंकणाऱ्या भाजपच्या पथ्यावर पडली होती. विधानसभेच्या सलग दोन निवडणुकांमध्ये ५४ टक्के मतांसह ७० पैकी अनुक्रमे ६७ आणि ६२ जागा जिंकणाऱ्या ‘आप’ला अद्याप लोकसभा निवडणुकीत खाते उघडता आलेले नाही. 

सातत्याने नाकारले; पण...दिल्लीत भाजपची किमान ३० ते ३२ टक्के मते पक्की असतात. विधानसभेत १९९३ साली एकदाच सत्तेत आलेल्या भाजपला दिल्लीकरांनी १९९८ पासून सातत्याने नाकारले आहे. मात्र, २०१४ पासून लोकसभेच्या सर्व सातही जागांसाठी भाजप दिल्लीकरांची पहिली पसंत ठरला आहे. दुसरीकडे केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली यांनी २०१३ साली दिल्ली विधानसभेची काँग्रेसची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आणि २०२२ साली दिल्ली महापालिकेत १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपलाही पराभवाचा दणका दिला.  

नेतृत्वहीन काँग्रेसच्या मतांची बेरीज निर्णायकदोन वर्षांपूर्वी, दिल्ली पालिकेच्या २५० जागांसाठीच्या निवडणुकीत आपने ४२.०५ टक्के मतांसह १३४ जागांवर विजय मिळवित सत्ता संपादन केली. त्यावेळी भाजपने ३९.०९ टक्के मतांसह १०४ जागा तर काँग्रेसने ११.६८ टक्के मतांसह ९ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीतील ‘आप’-काँग्रेसच्या मतांची बेरीज भाजपपेक्षा जास्त भरली आहे.मतांचा हा टेंड्र कायम राहिला तर ‘आप’-काँग्रेस आघाडीला भाजपवर बाजी उलटविता येईल. पण त्यासाठी नेतृत्वहीन काँग्रेसच्या मतांची बेरीज निर्णायक ठरणार आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Aam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपा