शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:38 IST

Operation Sindoor: भारताच्या संरक्षण दलांकडून यशस्वीरीत्या राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री प्रथमच आमने सामने येणार आहेत.

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताने सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले होते. तसेच या कारवाईला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारताच्या संरक्षण दलांनी पाकिस्तानच्या हवाई तळांवर जबरदस्त हल्ला करत पाकिस्तानला युद्धविरामासाठी विनवणी करण्यास भाग पाडले होते. दरम्यान, भारताच्या संरक्षण दलांकडून यशस्वीरीत्या राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री प्रथमच आमने सामने येणार आहेत.

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आजपासून सुरू होत असलेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या दोन दिवसीय संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी चीनमधील किंगदाओ येथे दाखल झाले आहेत. तर तिथे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ हेसुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानने परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत. मात्र या संमेलनामद्ये राजनाथ सिंह आणि ख्वाजा आसिफ यांच्यामध्ये कुठलीही द्विपक्षीय चर्चा होणार नाही. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या सर्व चर्चांना थांबवले आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने शांघाई परिषदेबाबत दिलेल्या आपल्या अधिकृत वक्तव्यामध्ये म्हटले आहे की, राजनाथ सिंह हे एससीओची तत्त्वे आणि उद्देशांबाबत भारताची कटिबद्धता अधोरेखित करतील.  ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी भारताचा दृष्टीकोन समोर ठेवतील. तसेच या भागामधील दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया संपुष्टात आणण्यासाठी संयुक्त आणि निरंतन प्रयत्नांसाठी आवाहन करतील. त्याशिवाय ते एससीओअंतर्गत व्यापार, आर्थिक सहकार्य आणि कनेक्टिव्हिटीला वाढवण्यावरही भर देतील. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानRajnath Singhराजनाथ सिंह