शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

आसामात चहा उत्पादन घटल्याने किमती वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 6:06 AM

पुढील काही आठवड्यांत सरासरी पावसाची अपेक्षा आहे; परंतु चहाच्या झुडपांना उन्हाळ्यात पावसाळ्याच्या आगमनापर्यंत स्थिर पाऊस पडणे आवश्यक असते.

नवी दिल्ली : मान्सूनपूर्व वादळामुळे आसाममधील चहाच्या उत्पादनात १५ टक्क्यांची घट झाल्यामुळे चहाचे दर  वाढण्याची शक्यता आहे.मान्सूनपूर्व अवकाळी पावसाबरोबरच कोरोना संक्रमणामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनने वाहतुकीचे संकट आसाम आणि पश्चिम बंगालमधील चहा उद्योगांसमोर निर्माण केले आहे. मंदी आणि लॉकडाऊन यामुळे कर्मचारी रजेवर आहेत. चहा मळ्यांच्या ठिकाणी वाढत असलेले कोरोना संक्रमण व आता खराब हवामान असा दुहेरी मार चहा व्यवसायाला बसत आहे. लिलाव प्रक्रियेत आलेली शिथिलता व वितरणात आलेली समस्या यामुळे चहा उद्योगावर दूरगामी व अत्यंत प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आहे.  टी असोसिएशन ऑफ इंडियाचे (टीएआय) सरचिटणीस प्रबीर भट्टाचार्य यांनी सांगितले की, ‘आम्ही यावर्षी नव्याने सुरुवात होण्याची अपेक्षा केली होती. तथापि, दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ही शक्यता कमजोर झाली आहे.’ टी बोर्ड इंडियाच्या आकडेवारीनुसार, मार्च आणि एप्रिलमध्ये आसाममधील उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी कमी झाले आहे. मार्च २०१९ च्या तुलनेत हे उत्पादन तब्बल ३० टक्क्यांनी कमी आहे. पुढील काही आठवड्यांत सरासरी पावसाची अपेक्षा आहे; परंतु चहाच्या झुडपांना उन्हाळ्यात पावसाळ्याच्या आगमनापर्यंत स्थिर पाऊस पडणे आवश्यक असते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, भारताने स्थिर मान्सूनचा अखेरचा अनुभव  १९९६ ते १९९८ च्या दरम्यान सलग तीन वर्षे घेतला होता.  

टॅग्स :Assamआसाम