शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 13:15 IST

Smriti Irani VS Priyanka Gandhi : स्मृती इराणी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून केएल शर्मा यांच्याकडून पराभूत झाल्या.

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत ते दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले होते. आता राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते रायबरेली मतदारसंघातून आपली खासदारकी कायम ठेवणार आहेत. तर काँग्रेसने प्रियंका गांधी यांना वायनाडमधून पोटनिवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गांधी परिवारातील आणखी एक सदस्य दक्षिणेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

गांधी घराण्याचे दक्षिणेशी जुने नाते आहे. इंदिरा गांधी यांनी १९७८ मध्ये कर्नाटकातील चिकमंगळूरमधून पोटनिवडणूक जिंकली होती. यानंतर १९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी आंध्र प्रदेशातील मेडक मतदारसंघातून विजय मिळवला होता. १९९९ मध्ये सोनिया गांधींनीही दक्षिणेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९९९ मध्ये सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही जागा जिंकल्या होत्या. मात्र, नंतर त्यांनी बेल्लारीची जागा सोडण्याचा निर्णय घेतला होता.

आता प्रियंका गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर या जागेवरून भाजप कोणाला उमेदवारी देणार, याची चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात रंगली आहे. वायनाडमधून भाजप नेत्या स्मृती इराणी यांना उमेदवारी देऊ शकते, अशीही सुरु चर्चा आहे. दरम्यान, स्मृती इराणी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून केएल शर्मा यांच्याकडून पराभूत झाल्या. मात्र २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव केला होता. अशा स्थितीत भाजप त्यांना वायनाड जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधींविरोधात लढवली होती निवडणूक यापूर्वीही भाजपने उमेदवारी तिकिटांबाबत आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. सोनिया गांधींना १९९९ मध्ये बेल्लारीतून काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यानंतर भाजपने याच जागेवरून सुषमा स्वराज यांना तिकीट देऊन निवडणूक चुरशीची बनवली होती. या जागेवर सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांना कडवी टक्कर दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. सोनिया गांधींना ४१४००० मते मिळाली होती. तर सुषमा स्वराज यांना साडेतीन लाखांहून अधिक मते मिळाली होती. सोनिया गांधींना ही निवडणूक जवळपास ५६००० मतांनी जिंकता आली.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीwayanad-pcवायनाडcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाPriyanka Gandhiप्रियंका गांधी