शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 13:42 IST

Shivdeep Lande News: मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे त्यांच्या धडाकेबाज कारवायांसाठी बिहारसह देशभरात प्रसिद्ध आहे. दरम्यान, त्यांनी अचानक नोकरीचा राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तसेच ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.

मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे त्यांच्या धडाकेबाज कारवायांसाठी बिहारसह देशभरात प्रसिद्ध आहे. दरम्यान, त्यांनी अचानक नोकरीचा राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तसेच ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, शिवदीप लांडे यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देताना आपण कुठल्याची राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवदीप लांडे यांनी पोलीस खात्यामधील नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, या चर्चांनी शिवदीप लांडे यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचारसणीसोबत जोडून घेण्याचा आपला विचार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच आपलं नाव कुठलाही नेता आणि पक्षासोबत जोडू नये, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

दरम्यान, याबाबत शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात की, कालपासून मला जे प्रेम आणि प्रतिक्रिया मिळत आहेत, त्याबाबत मी कधीही विचार केला नव्हता, त्यासाठी सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो. मी काल राजीनामा दिल्यानंतर काही प्रसारमाध्यमांनी मी कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश करणार का? याबाबतची शक्यता चाचपून पाहण्यास सुरुवात केली. तर मी या पोस्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, माझं कुठल्याही राजकीय पक्षासोबत बोलणं सुरू नाही आहे, तसेच मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचारधारेसोबतही जात नाही आहे. त्यामुळे कृपया माझं नाव कुणासोबच जोडू नका, असं आवाहन शिवदीप लांडे यांनी केलं.

शिवदीप लांडे यांनी बुधवारी अचानक पूर्णिया विभागाच्या आयजी पदासह नोकरीचा राजीनामा दिला होता.  दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी पूर्णिया आयजी पदाची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर लगेचच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आलं आहे. तिरहुतसारख्या मोठ्या भागातून पूर्णियाला पाठवल्याने ते नाराज होते अशी चर्चा होती. राजीनाम्याबाबत माहिती देताना शिवदीप लांडे म्हणाले होते की, ''गेली 18 वर्षे शासकीय पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षांत मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा जास्त मानले आहे. माझ्या सेवेत काही चूक झाली असेल तर माफ करावे. मी यापुढे बिहारमध्येच राहणार आहे. बिहारच माझी कर्मभूमी असेल,'' असे त्यांनी स्पष्ट केले होते. 

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र