शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मरांडी यांच्यापाठोपाठ शत्रुघ्न सिन्हांची होणार भाजपमध्ये घरवापसी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 10:25 IST

नेतृत्वकुशल बाबूलाल मरांडी यांना परत भाजपमध्ये आणून अमित शाह यांनी मास्टरस्ट्रोक लगावल्याचे सिन्हा म्हणाले. मरांडी यांनी 2006 मध्ये भाजप सोडून जेव्हीएम पक्ष स्थापन केला होता.

नवी दिल्ली - झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी आपला झारखंड विकास मोर्चा (जेव्हीएम)  पक्ष भाजपमध्ये विलीन केला. केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्या खेळीमुळेच हे शक्य झाले असून त्यांच्या या कृतीचे काँग्रेसनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी कौतुक केले आहे. तसेच मरांडी यांच्या घरवापसीमुळे 14 वर्षांचा वनवास समाप्त झाल्याचे उद्गार सिन्हा यांनी काढले. त्यामुळे आता शत्रुघ्न सिन्हा देखील भाजपमध्ये घरवापसीच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सिन्हा यांनी ट्विट करून अमित शाह यांचे कौतुक केले. तसेच शाह यांना मास्ट्रर स्ट्रॅटर्जिस्ट संबोधले आहे. जबरदस्त व्यक्तमत्व, इमानदार, विश्वासू आणि नेतृत्वकुशल बाबूलाल मरांडी यांना परत भाजपमध्ये आणून शाह यांनी मास्टरस्ट्रोक लगावल्याचे सिन्हा म्हणाले. मरांडी यांनी 2006 मध्ये भाजप सोडून जेव्हीएम पक्ष स्थापन केला होता.

बिहारमधील निवडणुकीशी कनेक्शनभाजपमध्ये बंडखोरी केल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रसमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपच्या बाबतीत सिन्हा कायमच सॉफ्ट दिसून आले. त्यामुळे बाबुलाल मरांडी यांच्यानंतर सिन्हाही घरवापसी करणार का, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. काँग्रेसमध्ये गेल्यापासून सिन्हा राजकारणापासून दुरावले आहेत. त्यातच या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणूक आहे. अशा स्थितीत सिन्हा यांची भाजपमध्ये वापसी करणे शक्य असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.