शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
3
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
4
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
5
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
6
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
7
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
8
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
9
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
10
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
11
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
12
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
13
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
14
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
15
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
16
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
17
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
18
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
19
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
20
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती

शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 22:35 IST

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशासंदर्भात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे, विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी या विषयावर स्पष्टपणे भाष्य केले आहे...

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशासंदर्भात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे, विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. सोशल मीडियापासून ते टीव्हीवरील चर्चांपर्यंत यासंदर्भात चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत या विषयावर स्पष्टपणे भाष्य केले आहे.

यावेळी, शशीथरून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत का? असा प्रश्न विचारला असता, दुबे म्हणाले, "यासंदर्भात मी काहीही सांगू शकत नाही. ना माझे थरूर यांच्यासोबत काही व्यक्तिगत बोलणे होते, ना पक्षातही यासंदर्भात काही चर्चा आहे."

निशिकांत दुबे पुढे म्हणाले, "शशी थरूर संसदेच्या आयटी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना, आमचे गंभीर मतभेद होते. माझे त्यांच्यासोबत एवढे भांडण झाले होते की, मी एका वर्ष समितीच्या बैठकांना जाणेही बंद केले होते."

दुबे यांच्या मते, "थरूर हे समिती, सोशल मीडिया आणि राजकीय अजेंड्याच्या माध्यमाने चालवायचे. उलट, समितीचे काम माध्यमांमध्ये स्वतःला हायलाइट करणे नसते, तर दीर्घकालीन समाधान देणे असते.  पेगासस हेरगिरी वादाचे उदाहरण देताना ते म्हणाले, जेव्हा, भारत सरकारवर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, असे खुद्द सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, तेव्हाही थरूर यांनी समितीमध्ये जबरदस्तीने हा मुद्दा उपस्थित करत, त्याला राजकीय रंग दिला होता.

दरम्यान, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, शशी थरूर आणि त्यांचा एक फोटो माय गव्हर्नमेंट इंडियाच्या पेजवर दिसला होता. या दरम्यान काही बोलणे झाले का? असे विचारले असता दुबे म्हणाले, "नाही, माझे त्यांच्यासोबत काहीही बोलणे झाले नाही. ते दुसऱ्या कोणत्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून तेथे होते आणि मी एका वेगळ्या कार्यक्रमात होतो. ते अमेरिकेच्या शिष्टमंडळात होते, मात्र माझी त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारची वैयक्तिक चर्चा झाली नाही."

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाcongressकाँग्रेस