शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:56 IST

Shashi Tharoor news: थरुर आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात २०२० पासूनच मतभेद आहेत. शशी थरूर हे जी-२३ नावाच्या नेत्यांपैकी एक होते, जे संघटनेत बदल घडवून आणण्याचा पुरस्कार करत होते. या गटातील नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्ताचा दहशतवादाचा बुरखा फाडण्यासाठी रवाना झाली होती. या पाच शिष्टमंडळांपैकी तीन सत्ताधारी आणि दोन विरोधक या शिष्टमंडळांचे नेतृत्व करत होते. यामध्येच एक काँग्रेसचे खासदार शशी थरूर होते. त्यांनी काँग्रेसना न पटणारी विधाने केली होती. आता त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

आपल्याला फक्त त्या हल्ल्यांबद्दल माहिती मिळते जे आपण उधळून लावण्यात अयशस्वी झालो. कोणत्याही देशात ही एक सामान्य गोष्ट आहे. कोणत्याही देशाकडे विश्वासार्ह गुप्तचर यंत्रणा नाही, असे त्यांनी म्हटले होते. एकप्रकारे पहलगाम हल्ल्यावर केंद्र सरकारला थरुर यांनी परदेशात जाऊन क्लीन चिट दिली होती. यावरून काँग्रेस नाराज झाली होती. अनेक नेत्यांनी थरुर यांच्यावर टीका केली होती. तेव्हा थरूर यांनी सध्या मला यावर बोलण्यास वेळ नाही, आल्यावर पाहू, असे म्हणत प्रत्तुत्तर दिले होते. 

आता थरूर आणि इतर शिष्टमंडळ देखील भारतात आली आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींची भेटही घेतली आहे. यावेळी देखील थरूर आणि मोदी यांच्यात चांगली मैत्री दिसली होती. या गोष्टी काँग्रेसला खटकल्या आहेत. थरूर यांनी देखील दोन दिवसांपूर्वी आपले काँग्रेसच्या नेतृत्वासोबत मतभेद असल्याचे म्हटले आहे. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर चर्चा करू असे म्हटले होते. यावरून आता थरूर यांच्या काँग्रेस सोडण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

थरुर आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात २०२० पासूनच मतभेद आहेत. शशी थरूर हे जी-२३ नावाच्या नेत्यांपैकी एक होते, जे संघटनेत बदल घडवून आणण्याचा पुरस्कार करत होते. या गटातील नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. आतापर्यंत गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांना पक्ष सोडावा लागला आहे. मनीष तिवारी आणि शशी थरूर सारख्या नेत्यांना देखील बाजुलाच करण्यात आले आहे. पाकिस्तान विरोधात जाणाऱ्या या शिष्टमंडळात सहभागी करण्यासाठी काँग्रेसने वेगळ्याच नेत्यांची नावे दिली होती. परंतू, मोदींनी थरूर यांच्यासह चार नेते निवडले ज्यांचे त्या यादीत नाव नव्हते. काँग्रेसला आता ही गोष्टी देखील खटकू लागली आहे. यामुळे शशी थरूर यांच्यावर कारवाई झालीच तर त्यांना भाजपा पक्षप्रवेशाची ऑफर देण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा