चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्याला फाशी? केंद्र सरकारने उचलली पावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 02:22 PM2018-04-20T14:22:58+5:302018-04-20T14:41:36+5:30

अल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल उचलले आहे.

will rapist get maximum punishment of death penalty ?? central goverment about to take action | चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्याला फाशी? केंद्र सरकारने उचलली पावले

चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्याला फाशी? केंद्र सरकारने उचलली पावले

Next

नवी दिल्ली -  अल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. जम्मू कश्मीरमधील कथुआत आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणामुळे देशात संतापाची लाट उसळली. त्यानंतर अल्पवयीन चिमुरड्यावर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी असी मागणी देशभरामध्ये होत आहे. सरकारने अल्पवयीन चिमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पास्को कायद्याअंतर्गत बदल करण्यास सुरुवात केली आहे. 

केंद्र सरकारतर्फे आज सुप्रिम कोर्टात एक प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार, 0-12 वर्षांच्या चिमुरड्यांसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी असा प्रस्ताव केंद्र सरकारने मांडला आहे. त्यासाठी पॉस्को कायद्यात बदल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. अल्पवयीन चिमुरड्यांवर होणाऱ्या बलात्कारासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने लिखीत उत्तर दिलं. सर्वोच्च न्यायालय 27 एप्रिलला पुढील सुनावणी करणार आहे.



 

Web Title: will rapist get maximum punishment of death penalty ?? central goverment about to take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.