नवी दिली- राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जनता दल युनायटेडचे हरिवंश नारायण सिंह विजयी झाले आहेत. आपल्या उमेदवारास विजय मिळवून देण्यात रालोआ यशस्वी झाले असले तरी विरोधकांमध्ये मात्र फूट पडल्याचे आता दिसून येत आहे.राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारू शकतात तर आमच्या नेत्यांना म्हणजे केजरीवाल यांना पाठिंब्यासाठी फोन का करु शकत नाहीत असा प्रश्न आपचे खासदार संजय सिंह यांनी विचारला होता. आता काँग्रेसने आपला प्रत्युत्तर दिले आहे.
मोदींना पाठिंबा देईन म्हणणाऱ्या केजरीवालांना राहुल का फोन करतील? काँग्रेसचे आपला प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 15:31 IST