शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
3
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
5
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
6
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
7
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
8
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
9
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
10
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
11
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
12
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
13
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
14
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
15
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
16
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
17
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
18
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू

27 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 8:42 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिल्यानत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिल्यानत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. 27 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसमोर मोदी भाषण देऊ शकतात. यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक मंचावरून मोदी दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानला इशारा देण्याची शक्यता आहे.  दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होतील. तसेच न्यूयॉर्कमध्ये अनेक देशांसोबत मोदी द्विपक्षीय चर्चा करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये भाषण दिले होते. आता दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये संबोधित करणार आहेत.  संयुक्त राष्ट्रांमध्ये 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यत महाचर्चा बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. यादरम्यान, 24 सप्टेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प हे आमसभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये नरेंद्र मोदी हे काश्मीर प्रश्नाचा उल्लेख शक्यतो टाळतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र जागतिक मंचावरून पाकिस्तानला ते कठोर संदेश देतील. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारत नेहमीच विविध विषयांवर नेहमीच प्रभावीपणे आपली भूमिका मांडत आला आहे. काही वर्षांपूर्वी देशाच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आमसभेसमोर केलेल्या संबोधनाचा दाखला आजही दिला जातो.  सुषमा स्वराज यांनी 2016 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसमोर काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानला कठोर इशारा दिला होता. त्यांच्या या भाषणाची आजही देशात चर्चा होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ