आई-वडिलांकडे हनिमूनचा व्हिडीओ मागणार का ? भाजपा आमदाराची जीभ घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2016 13:42 IST2016-10-05T13:36:32+5:302016-10-05T13:42:17+5:30
भारताने केलेल्या सर्जिंकल स्ट्राईकचा पुरावा मागणा-यांविरोधात टीका करताना भाजपा आमदार रामेश्वर शर्मा यांची जीभ घसरली आहे

आई-वडिलांकडे हनिमूनचा व्हिडीओ मागणार का ? भाजपा आमदाराची जीभ घसरली
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 5 - भारताने केलेल्या सर्जिंकल स्ट्राईकचा पुरावा मागणा-यांविरोधात टीका करताना भाजपा आमदार रामेश्वर शर्मा यांची जीभ घसरली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते पी चिदंबरम आणि संजय निरुपम यांच्यावर रामेश्वर शर्मा यांनी टीका केली असून ' जे लोक लष्कराच्या जवानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत ते असे लोक आहेत जे आपल्या आई - वडिलांच्या मधुचंद्राचा व्हिडीओ पाहून आपला बाप हाच आहे का याची खात्री करुन घेतील', असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
'जे जवानांवर विश्वास करत नाहीत ते गद्दार आहेत. हे पाकिस्तानचे एजंट आहेत. हे ते बोलत नसून त्यांच्या तोंडून नवाज शरिफ आणि पाकिस्तानचे एजंट बोलत आहेत,' असंही रामेश्वर शर्मा बोलले आहेत.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते पी चिदंबरम आणि संजय निरुपम यांनी केंद्र सरकारकडे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत. एकीकडे रामेश्वर शर्मा यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं असताना भाजपा नेते आलोक संजर यांनीदेखील यामध्ये भर टाकली आहे. काही लोक मला विचारत होते की 'जे लोक सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत ते आपल्या आईकडेही आपलेच वडिल असल्याचा पुरावा मागतात का ?', असं बोलले होते.
#WATCH BJP MLA Rameshwar Sharma speaks on politics on #SurgicalStrikes; makes a comment on Kejriwal, Nirupam's parents' wedding night. pic.twitter.com/Kz9AWKB0mB
— ANI (@ANI_news) October 5, 2016