भाजप किंवा मोदींना पाठींबा देणार नाही - मायावती

By Admin | Updated: May 9, 2014 17:57 IST2014-05-09T16:40:57+5:302014-05-09T17:57:20+5:30

बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी आपण मोदींना आणि एनडिएला पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले आहे.

Will not support BJP or Modi - Mayawati | भाजप किंवा मोदींना पाठींबा देणार नाही - मायावती

भाजप किंवा मोदींना पाठींबा देणार नाही - मायावती

ऑनलाइन टीम 
लखनऊ, दि.९ -  बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी आपण मोदींना आणि एनडीएला पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले आहे. पत्रकारांशी बोलताना मायावती म्हणाल्या, एका मुलाखतीमध्ये मोदींनी असे विधान केले आहे की, गरज पडल्यास एआयडीएमकेच्या जयललिता, तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी व बसपा आम्हाला पाठींबा देतील. परंतु मी हे स्पष्ट करू इच्छिते की,  आम्ही मोदी अथवा भाजपला पाठींबा देणार नाही. 
निवडणुकीच्या सुरूवातीच्या काळात मोदींनी आपल्याला एनडीएला इतर पक्षांचा पाठिंबा लागणार नाही असे विधान केले होते.  मात्र आता त्यांनी आपल्याच विधानावर घूमजाव केले आहे.  या विधानावरून त्यांना निवडणुक जिंकण्याविषयी आशंका वाटू लागल्याचे दिसत असल्याचे मायावती म्हणाल्या.  तसेच देशभरात मोदींची लाट असल्याचा जो दावा करण्यात येत आहे, त्यातही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोदींच्या भाषणाला व खेळीला बळी न पडण्याचा सल्ला दिला.  
लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यात १२ मे रोजी वाराणसी व आझमगढसह पूर्वांचलमधील १८ जागांवर मतदान होणार आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, आपचे अरविंद केजरीवाल, मुलायम सिंग यादव, कलराज मिश्रा आदी दिग्गजांचे भवितव्य यावेळी ठरणार आहे. 
 

Web Title: Will not support BJP or Modi - Mayawati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.