शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कितीही विरोध करा, सरकार झुकणार नाही; सुधारित नागरिकत्व कायद्यावर अमित शहा ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 19:31 IST

विरोधकांनी हवं तितकं राजकारण करावं; अमित शहांचा आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन देशातलं वातावरण पेटल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अल्पसंख्यांक शरणार्थींना आमचं सरकार नक्कीच नागरिकत्व देईल. विरोधकांना राजकारण करायचं असेल, तर त्यांनी जरुर करावं. भाजपा आणि मोदी सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं शहा यांनी म्हटलं. शरणार्थींना भारताचं नागरिकत्व मिळेल. ते भारतीय नागरिक होतील आणि देशात सन्मानानं राहतील, असं अमित शहा म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधी पक्षांकडून देशाची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. अल्पसंख्यांक समुदायातल्या कोणाही व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही. तशी कोणतीही तरतूद नव्या कायद्यात नाही, याचादेखील त्यांनी पुनरुच्चार केला.  अमित शहांनी उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेसचा समाचार घेतला. मी काँग्रेसला सांगू इच्छितो की सुधारित नागरिकत्व कायदा नेहरु-लियाकत कराराचा भाग होता. मात्र ७० वर्षांपासून हा कायदा लागू होऊ शकला नाही. कारण तुम्ही कायम मतपेढीचं राजकारण केलं, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. आमच्या सरकारनं सुधारित नागरिकत्व कायदा लागू केला आहे. त्यामुळे लाखो-कोटी लोकांना देशाचं नागरिकत्व मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. एकीकडे अमित शहा सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल अतिशय ठाम असताना दुसरीकडे विरोधकांनी हा कायदा मागे घेण्याची मागणी करत आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. दिल्ली आणि ईशान्य भारतातली परिस्थिती तणावपूर्ण असल्याचं यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी म्हटलं. या प्रकरणात राष्ट्रपतींना लक्ष घालण्याची विनंती केल्याचं गांधींनी माध्यमांना सांगितलं. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAmit Shahअमित शहाBJPभाजपाcongressकाँग्रेस