जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- मोदी
By Admin | Updated: June 1, 2014 19:27 IST2014-06-01T19:27:56+5:302014-06-01T19:27:56+5:30
यंदाच्या निवडणुकीत जनतेने आशेपोटी भाजपला निवडून दिले असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- मोदी
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १ - देशातील मतदारांनी जातीय, भौगोलिक समीकरणे मोडून आशेपोटी भाजपला निवडून आले असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.
दिल्लीत रविवारी संध्याकाळी भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 'यंदाच्या निवडणुकीने संपूर्ण समीकरणेच बदलून टाकली आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत त्यांच्या हितासाठी काम करणे हे आपले दायित्व आहे असे मोदींनी सांगितले. जनतेसोबत चालून आपण देश पुढे नेल्यास लोकांचा लोकशाहीवरील विश्वास वाढले. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचा प्रभाव वाढेल असे मोदींनी नमूद केले.
पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यावर पहिल्यांदाच भाजप मुख्यालयात आलेल्या मोदींनी अटलबिहारी वाजपेयींच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही मुख्यालयात फुलांच्या माळा, खुर्च्या लावत होतो अशी आठवण त्यांनी सांगितली.