शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

भारताला गोभक्त पंतप्रधान आणि हिंदूंपासून मुक्त करणार - झाकीर मुसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 11:39 IST

भारताला गोभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूपासून मुक्त करणार असल्याची धमकी झाकीर मुसाने दिली आहे. बकरी-ईदच्या आधी झाकीर मुसाने 10 मिनिटांचा ऑडिओ मेसेज जारी करत ही धमकी दिली आहे.

नवी दिल्ली, दि. 1 - दहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर आणि अल-कायदाचा दहशतवादी असलेला झाकीर मुसाने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. भारताला गोभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूपासून मुक्त करणार असल्याची धमकी झाकीर मुसाने दिली आहे. बकरी-ईदच्या आधी झाकीर मुसाने 10 मिनिटांचा ऑडिओ मेसेज जारी करत ही धमकी दिली आहे.

झाकीर मुसा धमकी देताना बोलला आहे की, 'गोभक्त नरेंद्र मोदी राजकारण आणि डिप्लोमसी करत लोक जमा करु शकतात, मात्र ते आम्हाला थांबवू शकत नाहीत. आम्ही भारतात इस्लामचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही'. 

यावेळी झाकीर मुसाने रोहिंग्या मुस्लिमांना निर्वासित करण्यावरुन केंद्र सरकारला चेतावणी दिली आहे. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने देशातील जवळपास 40 हजार रोहिंग्या मुस्लिमांना निर्वासित करण्याची योजना आखत असल्याचं सांगितलं होतं. यामधील सहा हजार मुस्लिम जम्मूत राहतात. 

झाकीर मुसाने आपला धमकीचा हा मेसेज युट्यूब चॅनेल 'अन्सर गजवा'वर रिलीज केला आहे. त्याच्या समर्थकांनी हा ऑडिओ मेसेज सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. याआधी झाकीर मुसाची दहशतवादी संघटना असलेल्या 'अन्सर-गजावत-उल-हिंद'च्या मीडिया सेलने एक पोस्टर जारी करत लवकरच अल्ला आपली इच्छा पुरी करणार असल्याचं लिहिलं होतं. श्रीनगर पोलिसांनी पोस्टरसंबंधी चिंता व्यक्त करत ही झाकीर मुसाची दहशतवादी हल्ल्याची धमकी असल्याचं सांगितलं होतं. 

आपल्या या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये झाकीर मुसा पाकिस्तानविरोधातही बोलला आहे. 'काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणा-या तरुणांचा पाकिस्तानी लष्कर आणि सरकारने विश्वासघात केला आहे. अमेरिकेला साथ देत, त्याच्या फूस लावण्यावरुन पाकिस्तानने दहशतवाद्यांचे अनेक ट्रेनिंग कॅम्प बंद केले आहेत. इतकंच नाही तर काश्मीरमधील अनेक मुजाहिद्दीन त्यांच्या ताब्यात आहेत', असं झाकीर मुसा बोलला आहे. 

काश्मीरचा लढा आपल्या इतर सहका-यांसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचंही झाकीर मुसाने सांगितलं आहे. तसंच काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या लढाईत आपल्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही असं सांगत झाकीर मुसाने पाकिस्तानला सुनावलं आहे. 

टॅग्स :TerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला