शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या राजकीय नाट्यामध्ये नवा ट्विस्ट, जेडीएस देणार भाजपाला पाठिंबा?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 08:48 IST

कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर आता  कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र कर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्याप संपलेले नाही.

बंगळुरू  - कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर आता  कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र कर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्याप संपलेले नाही. आता कर्नाटकमधील राजकीय नाट्यात नवा ट्विस्ट आला असून, सत्तेतून बाहेर झालेल्या जेडीएसच्या आमदारांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्यात यावा, असी मागणी केली आहे.  जेडीएसच्या आमदारांनी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना सांगितले की, येडियुरप्पा यांच्या सरकारला सरकारमध्ये सहभागी होऊन किंवा बाहेरून पाठिंबा देऊन समर्थन देता येऊ शकेल. मात्र या आमदारांनी अंतिम निर्णय कुमारस्वामी यांच्यावर सोडला आहे. तसेच ते जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल असे सांगितले आहे.  जेडीएसच्या आमदारांची शुक्रवारी बैठक झाली होती. त्यावेळी आमदारांच्या एका गटाने आपण विरोधी पक्षात बसावे आणि भाजपाच्या चांगल्या धोरणांचे स्वागत करावे असे सुचवले. मात्र चर्चेअंती सर्व आमदारांनी भाजपाला पाठिंबा देणे आणि सरकार वाचवणेच योग्य ठरेल, असे मत आमदारांनी व्यक्त केले. जेडीएसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत आम्ही पक्षासोबत एकजुटीने उभे राहण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत काही आमदारांनी सरकारला पाठिंबा द्यावा, असे मत मांडले. तर काही जणांनी विरोधी पक्षात बसावे, असे सुचवले, अशी माहिती जेडीएसचे नेते जी.टी. देवेगौडा यांनी दिली.   

दरम्यान, भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांना शपथ दिली. येडियुरप्पा यांना सोमवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. आपण सहज बहुमत सिद्ध करू, असा दावा त्यांनी केला.येडियुरप्पा यांनी १0५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे राज्यपालांना शुक्रवारी सकाळी सत्तास्थापनेचा दावा करताना सांगितले. मात्र ही संख्या बहुमतासाठी पुरेशी नाही. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी किती आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे, हे स्पष्ट होईल. काही आमदारांनी याआधी विधानसभाध्यक्षांना राजीनामे दिले आहेत. त्यांच्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. तसेच तीन आमदारांना विधानसभाध्यक्ष रमेश कुमार यांनी गुरुवारीच अपात्र ठरविले आहे. त्यामुळे सोमवारी किती जण मतदान करतात व किती जणांना मतदानाचा अधिकार असेल, हे २ दिवसांत स्पष्ट होईल. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)BJPभाजपाkumarswamyकुमारस्वामीYeddyurappaयेडियुरप्पा