शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

४१ मजुरांना बाहेर काढण्यास अजून १ महिना लागणार? परदेशी तज्ज्ञांचा मोठा दावा, कारणही सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 18:05 IST

Uttarkashi Tunnel Collapse Rescue: बोगद्यात अडकलेल्या मजूरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असले तरी सातत्याने अडथळे, अडचणी येत आहेत.

Uttarkashi Tunnel Collapse Rescue:उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यामध्ये अडकेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम अंतिम टप्यात आहे. लवकरच मजुरांना सुखरूप बाहेर काढले जाईल, असे सांगितले जात होते. मजुरांना बाहेर काढण्यासाठी परदेशातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतली जात आहे. यातील एक तज्ज्ञाने मोठा दावा केला असून, त्या ४१ मजूरांना बाहेर काढण्यासाठी अजून १ महिना लागू शकतो, असे म्हटले आहे. 

ज्या परदेशी मशीन्सच्या सहाय्याने आतापर्यंतचे खोदकाम केले आणि लवकरच मजुरांना बाहेर काढले जाईल, असा सांगितले जात होते, ती मशीनच आता या बचाव मोहिमेसमोरचा मोठा अडसर बनत असल्याचे म्हटले जात आहे. ज्या मशीनची सर्वाधिक चर्चा होत आहे ती मशीन आता सातत्याने बिघडत आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. तसेच मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी नवनवीन तारखा दिल्या जात आहेत.

४१ मजुरांना बाहेर काढण्यास अजून १ महिना लागणार?

अमेरिकन तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी दिलेल्या नव्या माहितीनुसार, बोगद्यात अडलेले कामगार ख्रिसमसपर्यंत म्हणजेच २५ डिसेंबरपर्यंत त्यांच्या घरी असतील. ते सर्वजण  सुरक्षित आहे. बचावकार्य घाईने केल्यास आणखी समस्या वाढू शकतात. त्यामुळे बोगद्यात अत्यंत सावधगिरीने बचावकार्य सुरू आहे, असे डिक्स यांनी म्हटले आहे. डिक्स यांनी आता ऑगर मशीनचा वापर केला जाणार नसल्याचे सांगितले आहे. कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बोगद्याच्या वरच्या बाजूने खोदकाम करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या ड्रिलिंगसाठी लागणारी मशीन बोगद्याच्या वरच्या भागात नेले जात आहे. परदेशी तज्ज्ञांनी केलेल्या या विधानानंतर पीडितांच्या कुटुंबीयांची काळजी वाढल्याचे सांगितले जात आहे. बचाव मोहिमेवर देखरेख ठेवणारे जबाबदार अधिकारी दररोज वेगळी आणि नवनवीन विधाने करताना पाहायला मिळत आहेत. 

दरम्यान, ४१ मजुरांच्या सुटकेसाठी आणखी बराच वेळ लागू शकतो, असे तर्क या विधानावरून काढला जात आहे. तसेच एकामागून एक अडथळे, अडचणी बचावकार्यात येत आहेत. या बचाव मोहिमेसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पूर्णपणे अमेरिकन ऑगर मशीनवर अवलंबून नाही. एमडीएमए मॅन्युल ड्रिलिंगचा विचार करत आहे. आतापर्यंत ऑगरसारख्या मोठ्या मशीनच्या सहाय्याने खोदकाम करायला इतके दिवस लागले, तर आता कामगार छोट्या मशीन्स आणि अवजारांच्या सहाय्याने खोदकाम करू लागले तर त्यास किती वेळ लागेल? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड