शहरं
Join us  
Trending Stories
1
Narayan Rane : 'मी एका उपशाखा प्रमुखाला ठार मारणार होतो, बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून...'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
2
ट्रंप यांनी जाहीर केली सरकारी मदत घेणाऱ्या देशांची लिस्ट; त्यात भारताचे तीन शेजारी, भारताचे नाव आहे का?
3
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
4
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
5
वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरण्याचा कट! रुळांवर लाकूड ठेवल्याचे आढळले; मोठा अपघात टळला
6
"मला खुश करणं गरजेचं, अन्यथा..."; रशियन तेलावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा टॅरिफचा इशारा
7
बँक कर्मचारी संपावर जाणार, तीन दिवस व्यवहार होणार ठप्प; कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल?
8
धक्कादायक! ट्रंप यांची व्हेनेझुएलावर दुसऱ्या हल्ल्याची धमकी; आता कोलंबियाही रडारवर, दक्षिण अमेरिकेत युद्धाचे ढग?
9
भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
10
आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य!
11
‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
12
मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा
13
“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे
14
“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
15
“वचननामा नव्हे ‘वाचून’नामा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका
16
“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार
17
“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप
18
राज्यातील प्रत्येक बसस्थानक-नगरपालिकेत पुस्तकांचे सवलतीत दुकान; DCM शिंदेंची साहित्य संमेलनात घोषणा
19
ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल
20
बंडखोरी आटोक्यात; मात्र अपक्षांची डोकेदुखी कायम, ठाण्यात १३१ जागांसाठी ८६ अपक्ष रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

आता महागाईचा भडका उडणार? व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर मोठा परिणाम होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:08 IST

कच्च्या तेलाचे भांडार असलेल्या या देशातील अनिश्चित राजकीय परिस्थितीमुळे भारतासह जगाचे टेन्शन वाढले आहे.

अमेरिकेने व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करत तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईने जागतिक भू-राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे, जागतिक खनिज तेल बाजारावर याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे भांडार असलेल्या या देशातील अनिश्चित राजकीय परिस्थितीमुळे भारतासह जगाचे टेन्शन वाढले आहे.

महागाईचा धोका व्हेनेझुएलाने २०२५ मध्ये रोज ९ लाख बॅरल एवढ्या तेलाचे उत्पादन कले. या पुरवठ्यात व्यत्यय आल्यास कच्च्या तेलाच्या किमतीत जागतिक स्तरावर वाढ होणे अटळ आहे. यामुळे जे देश आपली बहुतांश गरज तेलाच्या आयातीद्वारे पूर्ण करत, अशा देशांना महागडे तेल खरेदी करावे लागल्यास देशातील महागाई वाढू शकते. यात भारताचाही समावेश आहे.

भारताचा १० व्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला -रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर दाललेले टॅरीफनंतर, आता व्हेनेझुएला संकट भारतासाठी नवी डोकेदुखी ठरू शकते. २०१३ मध्ये भारताच्या एकूण तेल आयातीत व्हेनेझुएलाचा वाटा १०% होता. २०२० मध्ये हा वाटा ३.६% पर्यंत घसरला. मात्र, नंतर, २०२५ मध्ये व्हेनेझुएला भारताचा १० व्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला. गेल्या वर्षात भारताने तब्बल २२ दशलक्ष बॅरल एवढे तेल तेथून खरेदी केले होते. मात्र, आता अमेरिकेच्या या कारवाईमुळे ही पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते.

भारत आणि व्हेनेझुएलामध्ये तेल व्यापाराव्यतिरिक्त औषधनिर्माण, यंत्रसामग्री आणि कापड उद्योगात मोठे संबंध आहेत. भारताने नुकत्याच तेथे जीवनरक्षक लसी पाठवल्या असून डिजिटल सहकार्यावरही करार केले आहेत. जर या देशावर अमेरिकेचा प्रभाव वाढला, तर भारतासोबतच्या भविष्यातील व्यापारावर आणि धोरणांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Venezuela crisis: Will US action trigger inflation in India?

Web Summary : US action in Venezuela threatens global oil supply. India, a major importer, faces potential inflation as Venezuela's oil exports are disrupted. Trade relations beyond oil are also at risk.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीCrude Oilखनिज तेल